संतांप्रमाणे कर्मवीर शंकरराव काळे यांचे समाजासाठी योगदान – महाराज चिखलीकर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०५ : कर्मवीर शंकरराव काळे यांना फक्त समाजाची काळजी होती. त्यांच्यासाठी राजकारण फक्त निमित्त होते. समाजाची निष्काम सेवा एवढेच त्याचे ध्येय होते. संतांचे धार्मिक क्षेत्रात जेवढे कार्य असते तेवढ्याच योग्यतेचे त्यांचे समाजासाठी योगदान असल्याचे गौरोवोदगार ह.भ.प. पुरोषोत्तम महाराज चिखलीकर यांनी काढले.

शिक्षण, सहकार, कृषी, सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाचा अजोड ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक, माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या ११ व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात आयोजित कीर्तनरूपी सेवेप्रसंगी ह.भ.प. पुरोषोत्तम महाराज पाटील चिखलीकर बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, समाजकारण आणि राजकारणाची टक्केवारी राजकीय व्यक्तींकडून सांगितली जात असली तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. परंतु कर्मवीर शंकरराव काळे यांच्यासाठी राजकारण फक्त निमित्त होते. त्यांची समाजाशी बांधिलकी असल्यामुळे त्यांनी १०० टक्के समाजसेवा केली. राजकारणात फक्त समाजाचा विचार केला. फक्त राजकीय क्षेत्रातच नव्हे तर त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रात देखील त्यांचे मोठे वलय होते. ह.भ.प. तुकाराम महाराज खेडलेकर हे साहेबांचे गुरु होते.

राजकारणी व्यक्तींना महाराज मंडळी सहसा स्वीकारीत नाही. परंतु सांप्रदायिक क्षेत्रात ज्याप्रमाणे संतांचे कार्य असते त्याप्रमाणे राजकीय क्षेत्रात तेवढ्याच योग्यतेचे कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांचे समाजकार्य असून आध्यात्मिक क्षेत्रासाठी देखील त्यांनी मोठी मदत केली आहे. जयंती त्या व्यक्तीची होत नसून त्याने केलेल्या कार्याची व समाजासाठी दिलेल्या योगदानाची जयंती होत असते. त्या व्यक्तीने केलेल्या योगदानाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्या व्यक्तींचे स्मारक व पुतळे उभारले जातात.

 कर्मवीर शंकरराव काळे यांनी जीवनभर समाजाचा विचार केला. त्यांनी ठरवल असते तर आपल्या स्वमालकीच्या असंख्य शाळा-महाविद्यालय सहजपणे त्यांनी उभारले देखील असते. परंतु गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी फक्त रयत शिक्षण संस्थेचे हित जोपासत निष्काम सेवा केली. त्यांच्या कार्याचा व निस्वार्थी सेवेचा सुगंध नेहमीच राज्यात दरवळत राहणार असून त्यांचे विचार आत्मसात करून त्यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करणे हि त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार अशोक काळे, शिक्षणमहर्षी, माजी खासदार, कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंचायत समिती कोपरगाव येथे विविध मान्यवरांनी त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी स्नेहल शिंदे, कारभारी आगवण, पद्माकांत कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, गौतम बँकेच्या माजी संचालिका पुष्पा काळे, स्नेहलता शिंदे, अनिल शिंदे, आ. आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे, अॅड. प्रमोद जगताप, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायण मांजरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब कदम, पद्माकांत कुदळे, विश्वास आहेर, ज्ञानदेव मांजरे, बबन कोळपे, चंद्रशेखर कुलकर्णी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधव खिलारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, 

संचालक दिलीप बोरनारे, सुधाकर रोहोम, सचिन चांदगुडे, अशोक मवाळ, सुनील मांजरे, वसंत आभाळे, मनोज जगझाप, शंकर चव्हाण, तसेच बाबासाहेब कोते, सतिश कृष्णानी, अशोक सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर काळे, बाबुराव कोल्हे, संभाजी काळे, राजेंद्र गिरमे, अशोक काळे, राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा वैशाली आभाळे, बाजार समितीचे संचालक शिवाजी देवकर, रामदास केकाण,पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे, कोपरगाव शहर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, 

माजी नगरसेवक मंदार पहाडे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी सुनील कोल्हे, आसवनी विभगाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य, संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे माजी सदस्य, कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.