कर्मवीर काळे कारखान्याच्या तज्ञ संचालकांचा सत्कार 

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या  कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या तज्ञ संचालक पदी पोहेगाव येथील प्रगतीशील शेतकरी गंगाधर गणपतराव औताडे  व ब्राम्हणगाव येथील माजी पंचायत समिती सदस्य श्रावण निवृत्ती आसने यांच्या निवडीबद्दल नुकताच त्यांचा कारखान्याचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Mypage

यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे,  सूर्यभान कोळपे, वसंतराव आभाळे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, अनिल कदम,  श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, प्रवीण शिंदे, शंकरराव चव्हाण, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप,  शिवाजीराव घुले, दिनार कुदळे, सुरेश जाधव, विष्णू शिंदे, प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबासाहेब  सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे आदी मान्यवर उपस्थित होते.

Mypage

सत्काराला उत्तर देतांना तज्ञ संचालक गंगाधर औताडे व श्रावण आसने यांनीमाजी आमदार अशोकराव काळे, कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांचे व संचालक मंडळाचे आभार मानले व कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या विचारांवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधून कारखान्याच्या प्रगतीसाठी काम करून मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याचे सांगितले.

Mypage