शेवगावात अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : शेवगावचे ग्रामदैवत खंडोबा मंदिर प्रांगणात मंगळवार ( दि. २२ )पासून २९ नोव्हेंबर अखेर अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा नvत् आयोजित करण्यात आला आहे. हभप श्रीराम महाराज उदागे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सप्ताहात रोज पहाटे चार पासून काकडा भजन, विष्णू सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, भजन, ४ वाजता प्रवचन, हरिपाठ व रात्री आठ ते दहा हरिकीर्तन अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे हे ३३ वे वर्ष आहे.

        या काळात काका महाराज मुखेकर, प्रा. दादासाहेब मरकड ,संजय महाराज बिलवाल, अक्षय महाराज उगले, रामायणाचार्य लक्ष्मण महाराज भवार, वैभव महाराज माळवदे, संदीप महाराज सालवडगावकर यांची प्रवचने तर हभप सोमनाथ महाराज कराळे, भागवताचार्य रामेश्वर महाराज चव्हाण, महंत राधाबाई महाराज सानप, हभप राम महाराज चोचरे, तारकेश्वर गडाचे महंत शांति ब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री व हभप किशोर महाराज सूर्यवंशी यांच्या कीर्तनाचा लाभ होणार आहे.

साप्ताहकालात  परिसरातील दानशूर व्यक्तींनी भाविकांच्या दोन वेळेच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. मंगळवारी दि. २९ ला राम महाराज उदागे यांचे सकाळी दहा ते बारा या वेळेत काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर धर्मराज बटुळे यांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे .तरी भाविकांनी या संधीचा  लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक खंडोबा नगर भजनी मंडळाने केली आहे.