आर.जे.एस फाऊंडेशन मध्ये जनार्दन स्वामींची पुण्यतिथी साजरी

कोपरगाव प्रतिनिधि, दि. ११ : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनमध्ये राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या ३३ वी पुण्यतिथी आयुर्वेदिक, होमिओपॅथी,नर्सिंग, फिजोथेरपी,फार्मसी, या वीभागात साजरी करण्यात आली.या निमित्ताने होमिओपॅथी कॉलेजकडून दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार अहमदनगर होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ.कल्पना ठूबे यांना प्रथम २०२२ चा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा या प्राध्यापिका अहमदनगर होमिओपॅथी मेडिकल कॉलेज मध्ये फार्मसी विभागाच्या प्रमुख पदावर आहेत. या क्षेत्रात ३२ वर्षाचा गाढा अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांना मोलाचे मागदर्शन केले.हा पुरस्कार दरवर्षी होमिओपॅथीक विभागाच्या संदर्भात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दिला जाणार आहे. याच दिवशी होमिओपॅथी कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सावनी यरनाळकर यांनी वाढदिवसानिमित्ताने श्री जनार्दन स्वामी रुग्णालयातील रुग्णांकरीता १०० ब्लॅंकेट वाटप करण्यासाठी रुग्णालयाच्या प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आले.

या कार्यक्रमास राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशनचे चेअरमन चांगदेव कातकडे, विजय कडू,दीपक कोटमे, डॉ.दिलीप कदम, होमिओपॅथी कॉलेजचे प्राध्यापक शीतलकुमार सोनवणे,इत्यादी मान्यवर उस्थितीत होते. सूत्रसंचालन माधुरी जमधडे, संस्कृती जीवानी यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.कल्याणी चुडीवाल यांनी केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.