मोटर सायकलच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : शेवगाव – गेवराई राज्य मार्गावरील चापडगाव शिवारात दोन मोटर सायकलच्या समोरासमोर झालेल्या जबरदस्त धडकेत  आखेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अशोक विक्रम उगले (वय ३४) व त्यांची मुलगी गौरवी उर्फ अवणी (वय ६) या बापलेकीचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून शेवगाव पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. ही घटना विजयादशमीच्या दिवशी मंगळवारी सायंकाळी सातचे सुमारास घडल्याने परिसरासह तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Mypage

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, उगले परिवाराने तालुक्यातील बेलगाव येथे आपल्या गावात देवीचे मंदिर बांधले असून मंगळवारी विजयादशमीचे   औचित्य साधून दि. २४ ऑक्टोबरला देवीच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा सोहळा आटोपून आशोक उगले हे आपली पत्नी मुलगा व मुलगी यांचेसह मोटरसायकल वरून शेवगावकडे निघाले असता चापडगाव शिवारात समोरून येणार्‍या मोटरसायकल स्वाराने त्यांच्या मोटर सायकलला जबरदस्त धडक दिली. त्यात उगले कुटूंब जबरदस्त जखमी झाले. 

Mypage

सर्व जखमींना नगरयेथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशोक उगले यांचा उपचार सुरु असतांना मंगळवारी रात्री ११ चे सुमारास तर मुलगी गौरी हीचा बुधवारी दुपारी दोनचे सुमारास मृत्यू झाला. सायंकाळी सहाचे सुमारास त्यांचे पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने अध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी या घटने बद्दल तीव्र शोक व्यक्त केला. मयत उगले यांचे मागे वृद्ध आई – वडिल, पत्नि पुनम व चिरंजीव शंभू असा परिवार आहे.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *