राहुल वरे मधुकर मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : राष्ट्रवादी कांग्रेस (अजित पवार गट ) सेवा दलाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी येथील सामाजिक कार्यकर्ते राहूल वरे व मधुकर मोहिते यांची तर शहराध्यक्ष पदी विशाल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विनोद साळवी यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र दिले आहे. नवनियुक्त पदाधिकारी निलेश लंके प्रतिष्ठानचे समर्थक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.

सामाजिक कार्यकर्ते सुनिल आहूजा, अलोक शिंदे, शिवाजी धनगर, अक्षय खोमणे, बुऱ्हान काझी, रोहित हुशार, नितीन गायकवाड, निलेश पंडित, आकाश रोकडे, संग्राम मंडलिक, नवनाथ भिसे आदींच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला.               

यावेळी सत्काराला उत्तर देताना सेवा दलाच्या माध्यमातून समाजातील जनसामान्यांना सर्वांगीण सहकार्य उपलब्ध करून देण्याचा मनोदय जिल्हा उपाध्यक्ष वरे यांनी व्यक्त केला आहे.