रेडिओ नगर ९०.४ एफएमवर RJ बनण्याची संधी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : स्नेहालय संचलित  रेडिओ नगर ९०.४ एफएम चा १३ जानेवारी २०२३ रोजी १२ वा वर्धापन दिन यंदा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने आम्ही रेडिओ उद्धघोषक स्पर्धा (RJ कॉन्टेस्ट) आयोजित करत आहोत. स्पर्धेविषयी अधिक माहिती पुढीलप्रमाणे:

स्पर्धेचे नियम व अटी:
१. स्पर्धा ही तीन गटात घेतली जाईल. पहिला गट: स्नेहालय कर्मचारी, दुसरा गट: स्नेहालयातील पंधरा वर्षाखालील विद्यार्थी व विद्यार्थिनी व तिसरा गट : खुला गट

२. स्पर्धेसाठी पुढील दहा विषय असतील.
१. स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी.
२. सिनेमा: आजचा, कालचा आणि उद्याचा.
३. वेबसिरिजची दुनिया.
४. ऐतिहासिक नगर शहर..
५. स्त्री म्हणून वेगळं जगायचंय मला..
६. आणखी किती निर्भया?
७. आनंदाचा टोल फ्री क्रमांक: मित्र
८. संविधान रक्षण काळाची गरज.
९.  मराठी चित्रपट सृष्टीचे बदलते अंतरंग.
१०. सोशल मीडियात गुरफटलेली आजची तरुणाई.
११. कोणतीही ताजी घडामोड / घटना

३. स्पर्धकांनी वरीलपैकी कुठल्याही विषयांवर स्क्रिप्ट म्हणजे लेखन करायचे आहे व ती स्क्रिप्ट रेडिओ नगर 90.4 एफएम, प्रतिसाद केंद्र बालिकाश्रम रोड लेंडकर मळा या ठिकाणी स्पर्धेच्या दिवशी घेऊन येणे गरजेचे आहे.  
४. स्क्रिप्ट स्वलिखित असणे गरजेचे आहे.
५. स्पर्धेसाठी नाव नोंदणी 90 11 11 23 90 या क्रमांकावर करणे गरजेचे आहे.

६. ही स्पर्धा दिनांक ११ व १२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० ते ६ या वेळेत पार पडेल.
७. १० जानेवारी रोजी स्पर्धेची वेळ फोनद्वारे कळवली जाईल.

८. स्पर्धेचे स्वरूप : स्पर्धकांनी रेडिओ नगर केंद्रावर आल्यानंतर स्क्रिप्टचे वाचन (दोन ते तीन मिनिटात) सादर करावयाचे आहे.
९. स्पर्धेचा निकाल १३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाईल.
१०. स्पर्धेमध्ये विजेते स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. विजेत्यांसाठी रेडिओवर स्पेशल शो आयोजित करण्यात येईल. त्या विजेत्या स्पर्धकाला RJ म्हणून रेडीओवर शो करता येईल. ११. स्पर्धेसाठी कुठलेही शुल्क आकरण्यात येणार नाही. या स्पर्धे विषयी अधिक माहितीसाठी रेडीओ नगरच्या ९०११११२३९० या क्रमांकावर संपर्क साधावा.