कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीचे राजकीय वातावरण तापले 

८५ सरपंचासाठी तर ५७१ सदस्यासाठी निवडणुक रिंगणात

कोपरगाव प्रतिनिधी दि.८ : कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासुन तालुक्यातील गावपातळीवरचे वातावरण कडाक्याच्या थंडीतही तापले आहे. १८डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने अवघ्या काही दिवसात आपल्या ताब्यात ग्रामपंचायत खेचण्याची तयारी सुरु झाली आहे.

२६ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंच पदासाठी १५९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विविध तडजोडी अंति ७४ उमेदवारांनी आपला सरपंच पदाचा अर्ज माघार घेतल्याने आता ८५ उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या निकालावर अवलंबून आहेत.

तर २६ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी ८७० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यापैकी २९१ उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने आता ५७१ उमेदवारांमध्ये काटे की टक्कर सुरु झाली आहे. तर ६ ग्रामपंचायतीचे मिळुन ८ उमेदवार बिनविरोध झाले आहेत त्यात. मोर्वीस १, पढेगाव २, हांडेवाडी १, खोपडी २, करंजी बु. १ व बहादरपूर ग्रामपंचायतीच्या १ सदस्याचा सामावेश आहे.   बुधवारी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयाच्या आवारात मोठी गर्दी होती. निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय बोरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक प्रक्रिया पुर्ण करीत आहेत. 

तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील  सरपंच, व सदस्य उमेदवारांची  अंतिम संख्या गावनिहाय  पुढील   भोजडे – १८ सदस्य तर ५ सरपंच पदासाठी  , सडे- १४ सदस्य तर २ सरपंच पदासाठी ,  शिंगणापूर-  २सरपंच पदासाठी तर ३५ सदस्य , वेस – सोयगाव – २५ सदस्य  तर २ सरपंच पदासाठी, कोळपेवाडी- २९ सदस्य  तर ३ सरपंच पदासाठी,  वडगाव – २१ सदस्य तर ३ सरपंच पदासाठी, मोर्वीस – १२ सदस्य तर ३ सरपंच पदासाठी,

खिर्डीगणेश – २७ सदस्य तर ६ सरपंच पदासाठी, पढेगाव – २८ सदस्य तर ५ सरपंच पदासाठी, चासनळी – ३३ सदस्य तर ६ सरपंच पदासाठी,रांजणगाव देशमुख – २२ सदस्य तर २ सरपंच पदासाठी,  माहेगाव देशमुख – २७ सदस्य तर ३ सरपंच पदासाठी, शहापूर – १४ सदस्य तर २ सरपंच पदासाठी,  बहादराबाद १५ सदस्य तर २ सरपंच पदासाठी,डाऊच खुर्द – ३६ सदस्य तर ४ सरपंच पदासाठी, डाऊच बुद्रुक – १४ सदस्य तर ३ सरपंच पदासाठी,  देर्डे को-हाळे – १९ सदस्य तर २ सरपंच पदासाठी,तळेगाव मळे – १८ सदस्य तर ३ सरपंच पदासाठी,

चांदेकसारे – २७ सदस्य तर ४ सरपंच पदासाठी, धारणगाव – २२ सदस्य तर ४ सरपंच पदासाठी,हांडेवाडी – १२ सदस्य तर ३ सरपंच पदासाठी, बक्तरपुर – १४ सदस्य तर २ सरपंच पदासाठी,सोनेवाडी – २७ सदस्य तर ३ सरपंच पदासाठी, खोपडी – ११ सदस्य तर ४ सरपंच पदासाठी,करंजी बुद्रुक – ३२ सदस्य तर ३ सरपंच पदासाठी, बहादरपूर – १९सदस्य तर २ सरपंच पदासाठी उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

जनतेतून सरपंच पदाची थेट निवडणूक होणार असल्याने २६ पैकी अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी चौरंगी लढती होणार आहेत माञ खिर्डीगणेश, भोजडे, पढेगाव, चासनळी, येथे बहुरंगी लढती होणार असल्याने याठिकाणी मोठी रस्सीखेच होणार आहे.