ज्योती पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
कोपरगाव प्रतिनिधी दि.७: ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातुन केवळ आर्थीक व्यवहार न करता. सामाजिक बांधीलकी जपत कोपरगावचा चेहरामोहरा बदलण्यात मोलाचा वाटा आहे. ज्योती पतसंस्थेने खऱ्या अर्थाने विकासाची ज्योत सर्वात अगोदर पेटवल्यामुळेच कोपरगावच्या नावलौकीकात भर पडल्याचे गौरवोद्गार पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी काढले.
मंगळवारी सकाळी कोपरगाव येथील ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात संस्थेच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, संस्थेचे चेअरमन ॲड. रविंद्र बोरावके यांच्या हस्ते करण्यात आला. सर्व प्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.
या कार्यक्रमाला पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, ज्योती पतसंस्थेचे चेअरमन अॕड रवींद्र बोरावके , व्हा. चेअरमन देवराम सजन, संचालक प्रभाकर पाटील,मच्छिंद्र पठाडे , चंद्रशेखर भोंगळे , वाल्मीक भास्कर , महिंद्र नवले , कारभारी जुंधारे , तेजस्वी बोरावके, राजेंद्र बोरावके , कविता बोरावके , साधना आहेर, मुख्य व्यवस्थापक दिलीप रांधवणे, सुनील सह व्यवस्थापक सुनिल क्षीररसागर यांच्यासह संस्थेचे कर्मचारी, सभासद ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ॲड. रविंद्र बोरावके संस्थेच्या कार्याची माहीती देताना म्हणाले, ज्योती पतसंस्थेचे कार्य अतिशय पारदर्शक आहे. पेपर लेस कार्यप्रणाली सर्वप्रथम ज्योती पतसंस्थेच्या माध्यमातुन सुरू झाली. नोटबंधीच्या काळात आर्थीक बंधने असतानाही ज्योती पतसंस्थेने ग्राहकांना हवे ते आर्थीक व्यवहार चोख केले म्हणूनच ग्राहकांची पहीली पसंद ज्योती पतसंस्थेला आहे. संस्था ऑनलाइन व्यवहार करीत आहे.
डिडी काढणे, आरटीजीएस, एनईएफटी च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे, लाॕकर्स , सोनेतारण कर्ज, एस.एम.एस.सुविधा, मोबाईल बँकिग, कोअर बँकिंग, बी.बी.पी.एस, क्यु.आर. कोड, कलेक्शन सुविधा आदि विविध सुविधांसह शेतकरी बांधवांसाठी त्वरीत कमीतकमी व्याजदराने सोने तारण कर्ज उपलब्ध असुन पतसंस्थेची आर्थिक स्थिती मजबुत आहे सध्या १६५कोटीचे कर्ज वितरण आहे. गुंतवणूक १२४ कोटी, स्वनिधी २२ कोटी, नेट एन.पी.ए. शुन्य टक्के असुन संस्थेचा सतत आॕडीट वर्ग “अ” आहे.जनहीताच्या कार्यात ज्योती पतसंस्था कायम एक पाऊल पुढे आहे असेही ते म्हणाले.
दरम्यान पोलीस निरीक्षक वासुदेव देसले बोलताना पुढे म्हणाला, शहराच्या मुख्य रस्त्यावर आकर्षक वृक्षलागवड करुन कोपरगाव शहराचा चेहरा बदलण्याचे काम ज्योती पतसंस्थेने केल्याने मीही या हिरवळीच्या प्रेमात पडलो. ज्योती पतसंस्थेने शहरातील इतर रस्त्यांचे सुशोभीकरण करावे. सहकारी पतसंस्था चळवळीत काम करताना ज्योती सहकारी पतसंस्थेचा विकासाचा आलेख उंचावत गेला. सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देण्याचे काम पतसंस्थेचे अध्यक्ष अॕड रविंद्र बोरावके व त्यांच्या सहकार्यांनी मोठ्या प्रमाणात केले.
ज्योती पतसंस्थेने अल्पावधीत दैनंदिन व्यवहार, ठेवी, कर्ज पुरवठा यामध्ये नियोजनबध्द कार्य केल्यामुळे ही संस्था अनेक पतसंस्थांसमोर एक आदर्श निर्माण करत असुन पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. पतसंस्थेने करोना काळात सामाजिक बांधिलकी जपत विविध कामांवर भर दिला असल्याचे शेवटी देसले म्हणाले.ज्योती नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेञातील अनेक मान्यवर, सभासद, ग्राहक, कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.