निस्वार्थी काम करणे एक प्रकारे ईश्वर सेवाच – राहनवा कुमार

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.१६ : बहूजन समाजातील गरीब व वंचित बालकांना शिक्षणासह त्यांच्या राहण्याची, जेवणाची सुविधा उपलब्ध करून त्यांना सुजाण नागरिक बनवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तन, मन, धनाने निस्वार्थी काम करणे एक प्रकारे ईश्वर सेवाच आहे. अशा शब्दात येथील उचल फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव बांगलादेश मधील नवखाली येथील महात्मा गांधी आश्रम ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्काराने सन्मानित राहनवा कुमार यांनी येथे केला.

Mypage

शेवगाव येथील उचल फाउंडेशन संस्थेतील आरोग्य भवन इमारतीचे उद्घाटन राहनवा कुमार व त्यांच्या पत्नी तंद्रा बरुआ यांच्या हस्ते येथील प्रधान दिवाणी न्यायाधीश संजना जागुष्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी राह नवा कुमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. न्यायाधीश जागुष्टे म्हणाल्या, लहान बालक हे भगवंताचे स्वरूप असते. त्यामुळे बालकांची सेवा ही ईश्वर सेवा समजून उचल फाउंडेशन करत असलेले काम उल्लेखनीय व आदर्श असे आहे.

tml> Mypage

यावेळी नुकत्याच पार पडलेल्या भारत-बांगलादेश सायकल यात्रेत सहभागी झालेल्या शेवगाव येथील भागनाथ काटे, डॉ.संजय लड्डा, डॉ.मनीषा लढ्ढा, प्रा डॉ.गजानन लोंढे यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. इनरव्हील क्लबच्या भारती बाहेती, वसुधा सावरकर, ऍड शाम असावा, रोटरी क्लबचे अध्यक्ष मनीष बाहेती, सायकल क्लबचे अध्यक्ष विनोद ठाणगे, शाहू फुले आंबेडकर मंचचे अशोक शिंदे, रेणुका व्यवहारे उपस्थित होते.         सचिन खेडकर यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. प्रा.डॉ. लोंढे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. लड्डा यांनी आभार मानले. 

Mypage