तिळवणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आण्णासाहेब शिंदे बिनविरोध

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील तिळवणी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच जयश्री नानासाहेब गायके यांनी, रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या, उपसरपंचपदी काळे गटाचे आण्णासाहेब मनसुब शिंदे यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी ग्रामसेवक संजय काटे यांनी दिली आहे.

मागील दहा वर्षापासून तिळवणी ग्रामपंचायतीची सत्ता काळे गटाच्या ताब्यात असून उपसरपंच जयश्री नानासाहेब गायके यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सदरच्या उपसरपंच पदासाठी सरपंच गोविंद साक्रू पगारे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक नुकतीच पार पडली असून, उपसरपंच पदासाठी आण्णासाहेब मनसुब शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असलेले, ग्रामसेवक संजय काटे यांनी आण्णासाहेब शिंदे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर केले.

यावेळी कोपरगाव तालुका जिनिंग प्रेसिंगचे संचालक संदीप शिंदे, नानासाहेब निकम, माजी उपसरपंच जयश्री गायके, सदस्य सुनिता शिंदे, ताराबाई शिंदे, आश्विनी वाघ तसेच गोरख शिंदे, पोपट शिंदे, नानासाहेब गायके, पुंडलिक चक्के, भाऊसाहेब पोकळे, कचरू चक्के, चंद्रकांत गायके, नितीन गायके, भगवान शिंदे, आप्पासाहेब चक्के, रवींद्र पगारे, विठ्ठ्ल पगारे, श्यामराव शिंदे, किशोर शेळके, राजेंद्र गायके, संजय शिंदे, संतोष शिंदे, साईनाथ चक्के, नारायण गायके आदी मान्यवरांसह काळे गटाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.