पाण्याची योजना व बायपास रस्त्यासारखी कामे आम्ही दोघे मिळून पूर्ण करू अशी ग्वाही- सुजय विखे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : गावात येऊन मिरवणुका काढून फटाके फोडून काही फरक पडत नाही; केवळ श्रद्धांजलीसाठी वा विवाहाला हाजरी लावण्याने लोककल्याण होत नाही. तर येथील सर्व सामान्य नागरिकांच्या जीवनात बदल घडणे आवश्यक व गरजेचे आहे आणि तेच मी करत आहे.

आता राज्यात सत्तेत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या  नेतृत्वाखाली आमदार मोनिका व खासदार म्हणून माझ्या मार्फत विविध शासकीय योजनांचा लाभ जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य गतीने होत आहे. शासन आपल्या दारी कार्याद्वारे सर्वसामान्याचे रेशन, डोल, कुपन, जातीचे दाखले मिळवून देण्यासारखी प्रलंबित कामे आगामी एक वर्षात पूर्णपणे मार्गी लावली जातील.


पंतप्रधान नरेंद्र मोदी देश आणि नागरिकांच्या मागे खंबीरपणे उभे असून हा कार्यक्रम मतासाठी नाही. या कार्यक्रमाद्वारे मिळणारे पुण्य मोठे आहे. हा आमचा एकच स्वार्थ त्यामागे आहे. 

भ्रष्टाचार, व वाळू तस्करीमुळे येणारा माज आपण जिरवू, महिलांना निर्भय बनवू. भाजप सरकार तुमचे मनातील सरकार आहे. शेवगावात एका वर्षात पिण्याचे पाण्याची योजना व बायपास रस्त्या सारखी महत्वाची कामे आम्ही दोघे मिळून पूर्ण करू अशी ग्वाही खा. डॉ. सुजय विखे यांनी दिली. यावेळी भाजपा नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग,

ज्येष्ठ नेते बापू भोसले, नितीन काकडे, बापू पाटेकर, तुषार वैद्य, वाय. डी. कोल्हे, सागर फडके, महेश फलके , बाळासाहेब कोळगे, कमल खेडकर, उषा कंगणकर, उमेश भालसिग, आशुतोष उहाळे, सुनिल रासने कचरू चोथे, कमलत खेडकर, उषा कंगणकर आदिची उपस्थिती होती.

आ. मोनिका राजळे म्हणाल्या की, केंद्राच्या सर्व योजना मतदार संघात खासदार डॉ. विखे यांनी पूर्णपणे राबविल्या असून केंद्राच्या निधी पैकी ७० टक्के निधीखासदार विखे यांचे मुळे नगर जिल्ह्याला मिळाला त्यामुळे आधी काम केल्याचे समाधान मिळाले. दिव्यागांना विविध आवश्यक साहित्याच्या वाटपाच्या या उपक्रमा मागे कोणत्याही प्रकारचे राजकारण वा स्वार्थ नसून केवळ गरजवंताची सेवा हा विचार आहे.

यावेळी तालुक्यातील ४०० दिव्यांग बांधवांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच देशातील उत्कृष्ट काम करणाऱ्या दहा खासदारात डॉ. विखे यांचा समावेश झाल्याने त्यांचा आरोग्य दूत म्हणून शेवगावकर व नगरसेवक सागर फडके मित्र मंडळाच्या वतीने खा. विखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष भालसिंग यांनी प्रास्ताविक केले. भिमराज सागडे यांनी सुत्रसंचलन केले. शिवाजी संमिंदर यांनी आभार मानले.

ReplyReply allForward