शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला मागील आर्थिक वर्षात तीन कोटी ३१ लाख २६ हजार ७० रुपये उत्पन्न मिळाले. स्वर्गीय लोकनेते मारुत घुले यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वाटचाल चालू असल्याने बाजार समिती राज्यात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन सभापती एकनाथ कसाळ यांनी केले.
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे प्रमुख उपस्थितीत खेळीमेच्या वातावरणात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्ञानेश्वरचे संचालक काका नरवडे, मा. सभापती अरुण लाडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, कैलास नेमाने, संजय फडके, बबन भुसारी, अंबादास कळमकर, बापु लांडे, विष्णुपंत बोडखे, संभाजी तिडके,
उपसभापती गणेश खंबरे, संचालक राजेंद्र दौंड, राम अंधारे, नाना मडके, अॅड अनिल मडके, राहुल बेडके, अशोक धस, अशोक नेरळ, प्रदीप काळे, हनुमान पातकळ, मनोज जाकीर, कुरेशी जमी,र पटेल मनोज, कातकडे ताहेर, पटेल उत्तम, आहेर व्यापारी प्रतिनिधी पुरुषोत्तम धूत, कैलास देहाडराय, जवाहरलाल खटोड, नाथा ढाकणे, विठ्ठल थोरात, हमाल मापाडी,प्रतिनिधी कुंडलिक चव्हाण, समितीचे सचिव अविनाश म्हस्के, सहसचिव राजेंद्र राजपुरे, दीपक अभंग, कैलास कोरडे, दत्ता मुटकुळे, किशोर मगर, महेश जाधव, विजय पाखरे, अंकुश दळे, शंकर कर्डिले, जयप्रकाश पाचारणे आदी उपस्थित होते.
यावेळी कसाळ म्हणाले, माजी आमदार नरेंद्र पाटील, मा. आ. चंद्रशेखर पाटील घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श बाजार समिती म्हणून संस्थेने आपला लौकिक निर्माण केला असून अहवाल वर्षात बाजार समितीचे उत्पन्नात वाढ केली आहे. समितीने आज तागायत कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतले नसून अनेक विकास कामे केली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी निवास, व्यापारी संकुल, कांदा मार्केट, भुईकाटा, चाळणी यंत्र , अंतर्गत काँक्रीट रोड आदी सुविधा उपलब्ध केल्या असून सुमारे अकरा कोटीची विकास कामे केली आहेत.
या पुढील काळात मुख्य मार्केट शेवगाव येथे ८० टनी उपबाजार बालमटाकळी येथे पन्नास टनी वजन काटा बसवणे व उपबाजार बोधेगाव येथे पेट्रोल पंपाची उभारणी करणे तसेच शेवगाव मुख्य मार्केटमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले. संजय कोळगे यांनी प्रास्ताविक केले. माजी आ. चंद्रशेखर घुले, काका नरवडे यांनी मार्गदर्शन केले, राजेंद्र दौंड यांनी आभार मानले.