लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पणासाठी आमदार काळेंनी मागितली मंत्री महोदयांची वेळ

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : कोपरगाव शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण मंत्री महोदयांच्या उपस्थित व्हावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, सामाजिक न्याय मंत्री आदी मंत्री महोदयांकडे आ. आशुतोष काळे यांनी पत्राद्वारे वेळ मागितली आहे.  

Mypage

दिलेल्या पत्रात आ. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरात साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी मागील वर्षी (दि.६ एप्रिल रोजी) राज्याचे मुख्यमंत्री ना. अजित पवार पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या कर्मवीर शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व विविध विकास कामांच्या लोकार्पण व शुभारंभासाठी कोपरगाव येथे आले असता त्यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्याचे ठरले होते. परंतु दुर्दैवाने हे अनावरण त्यावेळी होवू शकले नाही.

Mypage

 लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण व्हावे, अशी मातंग समाजासह माझी देखील इच्छा आहे. त्याबाबत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला देखील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेनुसार कोपरगाव नगरपरिषदेने देखील सर्व नियोजन करून मंत्री महोदयांच्या हस्ते शासकीय पद्धतीने अनावरण करण्यासाठी माझ्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

Mypage

त्यामुळे माझ्या मतदार संघातील असंख्य मातंग समाज बांधवांच्या व माझ्या भावनांचा विचार करावा. येत्या काही दिवसात आपण नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी कोपरगाव दौऱ्याचे देखील नियोजन करून कोपरगाव शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय पद्धतीने अनावरण करावे अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, सामाजिक न्याय मंत्री यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

Mypage