शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी आजपर्यंत रक्त तयार करता आले नाही. त्या वरून रक्तदानाचे श्रेष्ठत्व अधोरखित होते. म्हणून प्रत्येकाने ते केले पाहिजे. असे आवाहन आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रशासकीय अधिकारी प्रा.लक्ष्मण बिटाळ यांनी केले.
शुक्रवारी दि(२१) कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे प्रमुख अॅड. डॉ.विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे यांच्या वाढदिवसानिमित्त निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स & सायन्स कॉलेज शेवगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
कार्यक्रमासाठी प्रशासकीय अधिकारी दीपक पाटील, शैक्षणिक समूहाचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे, जगन्नाथ गावडे, योगेश घोरपडे, डॉ.संजय लड्डा, डॉ.मनोज पूरनाळे, अंजली चिंतामण, वंदना पुजारी, प्राचार्य डॉ.प्रशांत दुकळे अर्पण ब्लड बँकचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र पाटील, भाग्यश्री पवार. सुषमा वैद्य, सुधीर माले उपस्थितीत होते.
प्रा.बिटाळ म्हणाले, आयुष्यात अनेकदा अचानक संकटे येतात. अनेकदा .रुग्णांना वेळेवर रक्त न मिळाल्याने रुग्ण दगावतात. त्यामुळे समाजाच्या बांधिलकीच्या भावनेतून सर्वांनी रक्तदान केले पाहिजे. वाढदिवसाच्या नावाखाली अवाढव्य खर्च करण्यापेक्षा सामाजिक हिताचे उपक्रमातून तो साजरा केला जावा. सर्वांनी रक्तदान करून पुण्यकर्म करावे.
यावेळी ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी अर्पण ब्लड बँक व निर्मलाताई काकडे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मधील प्राध्यापक व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.पी.ए. दुकळे यांनी सूत्रसंचालन प्रा. गुंड एस. ए. व प्रा. मिरड जे. एन. यांनी तर प्रा.राजेंद्र बांगर यांनी आभार मानले.