२५ फेब्रुवारी रोजी कोपरगाव मध्ये सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : ब्राह्यण सभा, कोपरगांव यांच्या ४१वर्धापन दिनाच्या निमित्तानं ब्राह्यण सभा, कोपरगांव आणि श्री. जनार्दन स्वामी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विदयमाने कोपरगांव शहरातील सर्व नागरीकांसाठी सर्वरोग निदान शिबिर शनिवार दि. २५ फेब्रुवारी रोजी ब्राह्यण सभा मंगल कार्यालय, श्रीराम नगर कोपरगांव येथे सकाळी ९.००वा.पासून  ते दुपारी १वा.पर्यत आयोजित केले आहे अशी माहीती एस.जे.एस. हॉस्पीटलचे कार्यकारी संचालक प्रसाद चांगदेव कातकडे आणि ब्राह्यण सभेचे सचिव सचिन देविदास महाजन यांनी दिली आहे.

         या शिबिरांमध्ये बी.पी, शुगर, २ डी ई को, ईसीजी इ. तपासणी करण्यात येणार असुन गरजुना मोफत औषधे वितरीत केली जाणार आहे. या शिबिरात अनुभवी तज्ञ डॉक्टर प्राचार्य यांचे मार्गदर्शन व सल्ला आणि आवश्यकता भासल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरीकांनी घ्यावा आसे आवाहन ब्राह्मण सभा, कोपरगांव आणि श्री.जनार्दन स्वामी हॉस्पीटल यांनी केले आहे.