प्राचार्य उगलमुगले भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्काराने सन्मानित

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.२४ : शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य पर्यटन, कला सांस्कृतिक विभाग, पोलीस बॉईज असोसिएशन व मैत्रीण महिला उद्योजिका ग्रुप जागतिक मानवाधिकार संरक्षण आयोग तसेच एस.पी.नाईन न्यूज चॅनल कोल्हापूर व लाईव्ह महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा ‘भारतीय संविधान जनजागृती रक्षक २०२३’ पुरस्कार येथील नवजीवन विद्यालयाचे प्राचार्य अशोक शंकरराव उगलमुगले यांना नुकताच पुणे येथे पिंपरीच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या समारंभात प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.

Mypage

       पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर उषाताई वाडेकर, महाराष्ट्र पर्यटन विभाग पुणे समन्वयक चंदन कुमार जोगे,यशदाचे बबन जोगदंड, यांच्या हस्ते उगलमुगले यांनी हा पुरस्कार स्विकारला. यावेळी मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.भारत वाबळे,विद्यालयाचे उपप्राचार्य सुनिल शिंदे, गोरक्षनाथ म्हस्के उपस्थित होते.

Mypage

      पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ. डॉ.नरेंद्र घुले पाटील, सचिव माजी.आ. चंद्रशेखर घुले पाटील, जिल्हा परिषदेच्या माजीअध्यक्षा राजश्री घुले पाटील, माजी सभापती डॉ.क्षितिज, प्रशासकीय अधिकारी के.वाय. नजन, प्राचार्य डॉ.शरद कोलते, दहिगाव-ने सरपंच सुनिता कांबळे, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे,सेवा संस्थेचे अध्यक्ष अरमन शब्बीर  शेख, रांजणीचे सरपंच प्रा.काकासाहेब घुले, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *