दिव्यांग सर्व्हेक्षण बाबत मुख्यमंत्री शिंदेनी दिले आदेश – विवेक कोल्हे

Mypage

 कोपरगांव प्रतिनिधी दि.१६ : जिल्हयात दिव्यांगांची नेमकी संख्या किती याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिका-यांना सर्व्हेक्षणाचे आदेश दिले त्याबददल जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी आभार मानले आहे. 

Mypage

 मुंबई सहयाद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील दिव्यांगांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात प्रधान सचिव विकास खरगे, दिव्यांग विकास विभागाचे सचिव अभय महाजन, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर आदिंच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक घेवुन राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या भागभांडवलातही वाढ केली त्यामुळे दिव्यांगांना कर्जवाटप पुर्ववत होणार आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात २९ लाख दिव्यांग आहेत. दिव्यांग बांधवाकडुन उत्पादित होणा-या साहित्याची विक्री व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, जे दिव्यांग स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास समर्थ आहेत त्यांना बॅटरीवर चालणारे वाहन देणे आदि बाबतही निर्देश दिले आहेत.

tml> Mypage

              कोपरगांव विधानसभा मतदार संघातील दिव्यांग बांधवांना जिल्हा आरोग्य अधिकारी व समाजकल्याण विभागाच्या अधिका-यांकडे नेवुन त्यांच्याकडुन आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करून घेवुन त्यांचे ओळखपत्र देण्याबाबत भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांनी स्वतंत्र यंत्रणा उभी करून दिव्यांगांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले आहे. त्यांच्या प्रलंबित अडचणी सोडविण्यासाठी संबंधीत अधिका-यांकडे पाठपुरावाही सुरू आहे असे विवेक  कोल्हे शेवटी म्हणाले. कोपरगांव तालुका दिव्यांग विभागाचे अध्यक्ष मुकूंद काळे व त्यांच्या सहकारी बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे.

Mypage