राजमाता जिजाऊ महिला बचत गटाची स्वनिधीतून गरजूंना मदत

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ : येथील राजमाता जिजाऊ महिला बचत गटाच्या महिला सदस्यांना लाभांश वाटण्याचा कार्यक्रम शहरातील संतोषी माता मंदिरात बचत गटाच्या अध्यक्षा मंदा रमेश गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला.
यावेळीसामाजिक कायावेळीर्यकर्ते तात्याबा भाऊसाहेब बनसोडे, भीमराव तांबे ,तसेच महिला बचत गटाचे मार्गदर्शक जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक रमेश गोरे उपस्थित होते. 

Mypage

     या महिला बचत गटात २१ महिला सभासद असून गटस्थापनेचे हे पाचवे वर्ष आहे. महिला बचत गटाच्या प्रत्येक सदस्य दरमहा दोनशे रुपये ठेव म्हणून जमा करतात. या स्तुत्य उमक्रमात जमा होणाऱ्या या स्वनिधीतून महिला बचत गटातील गरजू महिला सभासदांना नाममात्र व्याज आकारून कर्ज  उपलब्ध केले जाते.

Mypage

मंडळाच्या अध्यक्षा मंदा रमेश गोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून महिला बचत गटाच्या कामकाजाचा आढावा सादर केला. बचत गटाच्या सचिव सौ. भक्ती जगताप. पुष्पा बनसोडे, वर्षा ढोले, पुष्पा ढोले, सीमा वाघमारे, लीला माने, मीना बामदले, शुभांगी चव्हाण, कांता हरवणे, जनाबाई तांबे, मीना क्षिरसागर, आशा क्षिरसागर, सविता जगताप, शारदा कोळेकर, सविता रीसे, भारती कापरे  यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या. वैभव जगताप यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *