कोपरगाव प्रतिनिधी, दि.१९ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या प्रशिक्षित केलेल्या विदयार्थांच्या टाटा टेक्नॉलॉजिज या बहुराष्ट्रीय कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत मुलाखती घेवुन १५ नवोदित अभियंत्यांची नोकऱ्यांसाठी निवड केली, असुन कंपनीने त्यांना सुरूवातीस रू ४. ५० लाखांचे वार्षिक पॅकेज देवु केले आहे. एका पाठोपाठ कंपन्या संजीवनीच्या अभियंत्यांना निवड करीत असल्याने पालकांनी संजीवनीच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात कोल्हे यांनी म्हटले आहे की, टाटा टेक्नॉलॉजिज ही भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असुन ऑटोमोटिव्ह, एरोस्पेस, औद्योगीक यंत्रसमग्री, डिझाईन, इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या कौस्तुभ बाळासाहेब गायकवाड, अभिजीत शहाजी कदम, दिपक शिवाजी कुंभारकर, फैज अफ्रोज खान, राहुल संजय हिवाळे, प्रतिक्षा नंदु दिघे, साक्षी दत्तात्रय खटाणे, प्रज्वल रखमाजी घोगरे, देवेश कैलास जिरे, चेतन राजेंद्र लोणारे, स्वरूप देविदास गायकवाड, शुभम विजय हलवाई, सुहास बथुवेल पगारे, विशाल नामदेव तांबे व प्रज्वल संजय नालकर यांची निवड केली आहे.
कोल्हे पुढे म्हणाले की संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्याने वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांना अभिप्रेत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश अभ्यासक्रमात करण्याची परवानगी आहे. त्यासाठी वर्ल्ड क्लास विद्यापीठे, नामांकित कंपन्यांमधील मानव संसाधन विभाग, माजी विध्यार्थी, इत्यादींचा सल्ला घेवुन अभ्यासक्रम तयार केलेला असल्यामुळे कंपन्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठीत अभियंते मिळत आहे.
तसेच मुलाखतीसाठी भाषा कौशल्य, देहबोली, हजरजबाबीपणा, शिष्टाचार, केस व वेशभुषा, इत्यादी बाबींचा महत्वपुर्ण विचार करून तसे प्रशिक्षण दिल्या जाते. तसेच इंडस्ट्री मधिल उच्च पदस्थ व्यक्तींना आमंत्रित करून त्यांच्या यशोगाथा विध्यार्थ्यांना ऐकविल्या जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ‘मी यशस्वी होणारच’ ही भावना वाढीस लागुन सर्वच क्षेत्रात यश खेचुन आणतात, विशेषतः आई वडीलांनी ज्या हेतुने त्यांच्या पाल्यांना संजीवनी मध्ये दाखल केले तो हेतु साध्य करण्यासाठी संजीवनीचा शिक्षक वर्ग स्वतःला झोकुन देतो, आणि आई वडीलांबरोबरच त्यांनाही आपला विद्यार्थी स्वावलंबी होतो, तेव्हा तो आनंद काही वेगळाच असतो.
विद्यार्थ्यांच्या या निवडीबद्दल आणि ग्रामीण भागातील सर्व सामान्यांची मुलं मुली नोकरदार बनुन कुटूंबाचा आधार बनत असल्याने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.