कोल्हेवर आरोप करणाऱ्यांच्या काळ्या कारनाम्यांचा व्हिडिओ – दत्ता काले

 गोळीबार प्रकरणावरुन एकमेकांचे कारनामे आले पुढे

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : काळेंच्या कार्यकर्त्यांनी कोल्हेंचे फोटो गोळीबारातील आरोपी सोबत दाखवून कोल्हेंची अडचण वाढवण्याचा प्रयत्न  केला, पण कोल्हेंच्या कार्यकर्त्यांनी थेट कथीत व्हिडिओ असलेले पुरावे आणुन खळबळ उडवली आहे. संबंधित व्हिडिओ प्रसार माध्यमात दाखवण्यासारखे नसल्याने व्हिडिओ दाखवला नसले तरी काळेंच्या काही कार्यकर्त्यांचे तोंड काळे होणारे आहे असा आरोप भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी केले. 

कोपरगाव शहरात दोन गटातील अवैध कारणावरुन झालेल्या गोळीबाराची धग आजूनही शमली नाही. गोळीबार करणारे गोळीबार करून मोकळे झाले आणि कोपरगावमध्ये काळे विरुद्ध कोल्हे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याचे काम सुरु झाले. आपल्या कार्यकर्त्यांना पुढे करून एकमेकांचे काळे कारनामे बाहेर निघत आहेत.

सोमवारी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या शहरातील संपर्क कार्यालयात भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, माजी नगरसेवक बबलु वाणी, विजय आढाव व संदीप देवकर या पदाधीकाऱ्यांनी पञकार परिषद घेवून विवेक कोल्हे यांच्यावर गोळीबार प्रकरणी  काही आरोप करीत गोळीबार प्रकरणी आरोपी असलेल्या एका बरोबरचे फोटो माध्यमांना दाखवून गोळीबार प्रकरणात कोल्हे यांचे कार्यकर्ते सहभागी असल्याचा पुरावा काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला होता. त्यावर कोल्हे गटाचे दत्ता काले यांनी थेट व्हिडिओ दाखवण्याचा इशारा दिला.

ते पञकारांशी संवाद साधताना म्हणाले की, कोल्हे परिवाराने युवकांना नोकऱ्या देवुन अनेकांचे संसार व्यवस्थित केले, पण आमदार काळे यांनी गेल्या पाच वर्षांत युवकांना अवैध धंद्यात गुंतवून गुन्हेगारी वाढवली. गोळीबार प्रकरणात जखमी झालेल्या आरोपीने आमदार काळे व त्यांच्या स्वियसहाय्यक यांचे नाव घेवून आरोप केल्याने विवेक कोल्हे यांनी या प्रकरणी आवाज उठवला पोलीसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करुन नावे घेतलेल्यावर  गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. जर पोलीसांनी गुन्हे दाखल केले नाही, तर २ ऑक्टोबर रोजी आपण आंदोलन करण्याचा इशारा दत्ता काले यांनी दिला.

तसेच युवानेते कोल्हे यांच्यावर आरोप करणाऱ्या आमदार काळे  यांच्या पदाधीकाऱ्यांच्या काळ्या धंद्याचे काळे कारणामे आमच्याकडे व्हिडिओ पुराव्यानिशी आहेत. जर गुन्हे दाखल झाले नाही तर शहरातील चौकाचौकात काळेंच्या कार्यकर्त्यांच्या  काळ्या कारनाम्यांचे व्हिडिओ स्क्रीनवर दाखवले जातील. आमच्याकडे असलेल्या पुराव्याचे व्हिडिओ म्हणजे विरोधकांना  तोंड दाखवायला जागा राहणार नाही असे आहेत असे म्हणत काळे यांच्या पदाधिकाऱ्यांचा समाचार यावेळी दत्ता काले, बबलु वाणी, विजय आढाव व  संदीप देवकर यांनी घेतला. 

 दरम्यान आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यशैलीवर टिका करत त्याचे कार्यकर्ते अवैध व्यवसाय चालवून शहराची कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. त्यांना आमदार काळे यांचा राजाश्रय मिळत आहे. आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचे जर अवैध व्यवसाय असतील तर ते सत्तेतील आमदार आहे, त्यांनी पुराव्यानिशी खुशाल गुन्हे दाखल करावे आमचा नेता अशा कार्यकर्त्यांना कधीच पाठीशी घालत नाही. कोल्हेंनी जनहिताचे कार्य केले, पण काळेंनी केवळ कार्यकर्ते पोसण्यासाठी अवैध व्यवसाय करणाऱ्यांना बळ दिल्याचा आरोप यावेळी केले. 

कोल्हेंच्या पदाधिकाऱ्यांनी काळेंच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या काळ्या कारनाम्याचे व्हिडिओ असलेला पेनड्राईव आजूनही खिशात ठेवला आहे. तो बाहेर काढला  तर कोणा कोणाचे काळे कारनामे बाहेर येतील याची चर्चा जोरदार रंगली आहे.  

Leave a Reply