कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : पद्मभूषण खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत संकुलातील विद्यार्थ्यांना अल्प दरात दिल्या जाणाऱ्या सायकलचे आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकतेच वाटप करण्यात आले आहे.
बारामती येथील उद्योजक आर.जे. सायकल व रयत बँकेच्या संचालक मंडळाच्या सहकार्यातून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मभूषण खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ना नफा ना तोटा या तत्वावर अल्प दरात दरात सायकल देण्यात आल्या आहेत.
सुरेगाव-गौतमनगर येथील रयत संकुलातील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय, तसेच राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ट महाविद्यालय व श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयातील विदायार्थ्यानी देखील अल्प दरात सायकल मिळावी यासाठी नावे पाठविण्यात आली होती.
त्या सर्व विद्यार्थ्यांना बारामती येथील उद्योजक आर.जे.सायकल व रयत बँक संचालक मंडळाच्या सहकार्यातून सायकल देण्यात आल्या आहेत. यामध्ये श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ट महाविद्यालयासाठी २६, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ट महाविद्यालयासाठी १० व श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयासाठी ६८ अशा एकूण १०४ सायकली मिळाल्या आहेत.
या सायकलचे श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते प्राथमिक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक राजू पाचोरे, शिक्षक जगदीश बैरागी, सुनील भोईर, किरण वसावे, तसेच पालक सचिन शिंदे, नाजगड आदी उपस्थित होते.