शेतकरी कृषी समितीचे आमरण उपोषण सुरु, वर्ष उलाटले तरी नुकसान भरपाई मिळेना

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : कोपरगाव तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे आर्थिक नुकसान झाले. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले. माञ त्याला एक वर्ष उलटला तरीही नुकसान भरपाई मिळत नसल्याने, अखेर कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा पविञ घेत उपोषण सुरू केले आहे.

Mypage

या आमरण उपोषण आंदोलनात माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, काॅंगेसचे नितीन शिंदे, विजय जाधव, तुषार विद्वांस, मनसेचे अनिल गायकवाड, संतोष गंगावाल, कैलास देवकर, सदाशिव रासकर,नंदू बोरावके, हेमंत गिरमे, नरेंद्र गिरमे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा सहभाग आहे. 

Mypage

 तालुका शेतकरी कृती समीतीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२२ मध्ये तालुक्यात प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांची उभी पिके आडवी झाली. त्यात प्रामुख्याने सोयाबीन,मका, कांदा, कपाशी, ऊसासह इतर अनेक फळबागांचे नुकसान होवून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला.

Mypage

पावसाने होत्याच नव्हत केले. मायबाप सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचे जाहीर केले. माञ मदतीच्या हाताकडे शेतकऱ्यांनी डोळे लावून बसले पण वर्ष उलटला तरी नुकसान भरपाई मिळाली नाही.

Mypage

अखेर पाठपुरावा करून वैतागलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या सदस्यांनी सोमवारी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा पविञा घेतल्याने स्थानिक प्रशासन खडबडून कामाला लागले आहे.

Mypage

जो पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण करण्याचा मनोदय उपोषण कर्त्यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात कोपरगावचे तहसिलदार संदीप कुमार भोसले यांच्याशी चर्चा केली तेव्हा ते म्हणाले की, गेल्या वर्षी अति प्रमाणात पाऊस होवून शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यांची नुकसान भरपाई देण्याचे शासनाने ठरवले होते.

Mypage

माञ पुन्हा नव्याने वाढीव नुकसान देण्याची व्यवस्था केल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व शासनाच्या काही तांत्रिक अडचणींमुळे नुकसानभरपाई देण्यास विलंब झाला असला तरी सध्या नगर जिल्ह्यासाठी २४१ कोटींची नुकसान भरपाई रक्कम आलेले आहे. येत्या काही दिवसांत तांञिक बाबी दुरूस्त करुन संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

Mypage

तालुक्यात २७ हजार २००  नुकसान ग्रस्त लाभार्थी आहेत. शासनाने जिराईत क्षेञातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ८ हजार ५०० रूपये, बागायत क्षेञातील शेतकऱ्याला १७ हजार रूपये व बहुवार्षिक पिकांना २२ हजार ५०० प्रति हेक्टरी, नुकसान भरपाई देण्याचे जाहीर केले आहे.

Mypage

त्यानुसार तालुक्यातील १३ हजार ६१४.४२ हेक्टर, जिरायत क्षेत्रातील २९३.६५ हेक्टर व बहुवार्षिक मधील ५५.९४ हेक्टर क्षेञातील २७ हजार २०० नुकसानग्रस्त लाभार्थी आहेत. अशी माहिती तहसिलदार भोसले यांनी दिले. ते पुढे म्हणाले, कोपरगाव तालुक्यात २३ कोटी ५२ लाख रूपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. आत्तापर्यंत १० हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात आली असुन सध्या ७ हजार नुकसानग्रस्त शेतकरी वंचित आहेत. काही उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली असल्याचे सांगण्यात आले आहे.