कोपरगांव प्रतिनिधी, दि. १७ : मुळच्या अमेरिका स्थित मेजर लीग बेसबाॅल (एमएलबी) संघटनेच्या भारतातील शाखेने दिल्ली येथे घेतलेल्या राष्ट्रीय पातळीवरील एमएलबी स्पर्धेत संजीवनी अकॅडमी व संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या संयुक्त संघाने कांस्य पदकाची कमाई करून देशाच्या क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा नाव अधोरेखित केले आहे, अशी माहीती संजीवनी अकॅडमीच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील क्षमता ओळखुन त्यांना वेगेवेगळ्या खेळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येते. राज्य पातळीवर प्रथम एमएलबी स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातुन राष्ट्रीय पातळीवरील एमएलबी स्पर्धांसाठी चार संघांची निवड करण्यात आली, त्यात संजीवनीच्या संघाचा समावेश होता. दिल्ली येथे संपुर्ण देशातून एकुण १६० संघांनी सहभाग नोंदविला. यात संजीवनीच्या संघाने कांस्य पदकाची कमाई करून संजीवनीचे नाव देशात झळकाविले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील आव्हाने पेलण्या इतपत ग्रामिण विध्यार्थी सक्षम झाले पाहीजे. यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण देवुन त्यांच्यात सर्व प्रकारचे कौशल्ये विकसीत करणे गरजेचे आहे. अशी तळमळ संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक, माजी मंत्री कै. शंकररावजी कोल्हे यांची असायची. त्यासाठी ते प्रत्यक्ष स्कूल, काॅलेजेस मध्ये जावुन आढावा घ्यायचे. त्यांनी घालुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार संजीवनीचे व्यवस्थापन कार्य करीत असुन संजीवनीचे विध्यार्थी उत्तरोत्तर यशाची शिखरे गाठत आहे. दिल्ली येथिल संजीवनीच्या संघाचे यश हे कै. कोल्हे यांच्या तळमळीचे प्रतिबिंब आहे. तसेच विध्यार्थ्यांच्या यशामागे पालकांनी दाखविलेला अतुट विश्वासही महत्वाचा आहे. – अमित कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स
संजीवनीच्या संघात दिल्ली येथिल स्पर्धांमध्ये खेळाडू स्वरीत मनोज गोळेचा, निर्भय रूपेश पारख, श्रीजय निखिल बोरावके, कृष्णा निलेश बागुल, नैतिक सरोज, गिरीराज संदिप गाडे, वल्लभ अनिल कोते, आर्यन नितीन नारखेडे, सर्वेश तुषार शेळके, निल विकासय काटे, वेदांत परेश आढाव व पार्थ बाबुराव गांगुर्डे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व संजीवनी अकॅडमीच्या संचालिका डाॅ. मनाली कोल्हे यांनी या सर्व यशस्वी खेळाडूंचा त्यांच्या पालकांसमवेत छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्राचार्या सौ. शैला झुंजारराव उपप्राचार्य विलास बागडे, हेड मिस्ट्रेस रेखा साळुंखे व सौ. माला मोरे उपस्थित होते.