राष्ट्रीय लोक अदालतीत कोपरगाव न्यायालय जिल्ह्यात प्रथम

 एका दिवसात ४ हजार ८७१ खटले निकाली, तर  ५ कोटी ४१ लक्ष ७३ हजाराची वसुली

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.१४ : जिल्हा न्यायाधिश सयाजीराव को-हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव न्यायालयाने एकाच दिवशी तब्बल ४ हजार ८७१ प्रलंबित खटले निकाली काढून जिल्ह्यात विक्रम केला आहे. जिल्ह्यातील तालुका निहाय खटले निकालात कोपरगाव न्यायालय अव्वल ठरले आहे.  वर्षानुवर्षे नागरीकांच्या खटल्यत होणारी दिरंगाई कमी करण्यासाठी व त्वरीत न्यायनिवाडा करुन प्रलंबित खटले मिटवून नागरीकांची मानसिक व आर्थीक तुट भरुन क ढण्याचा प्रयत्न न्यायव्यवस्था करीत आहे. याचाच भाग म्हणून कोपरगाव न्यायालयात १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एका दिवसात ४हजार ८७१ खटले निकाली निघाले असून तडजोडी अंति ५ कोटी ४१ लक्ष  ७३ हजार ८४१ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

 जिल्हा न्यायाधिश सयाजीराव को-हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील ७९ गावांमध्ये कायदेविषयक जनजागृती करुन २६ शिबिरे घेण्यात आली. या शिबीरांच्या माध्यमातुन गावोगावी जावून कायदेविषयक कायदे तज्ञांनी मार्गदर्शन करीत नागरीकांना प्रबोधन केल्याने नागरीकामध्ये जागृती झाली त्यामुळे बहुतांश खटले दाखल होण्यापुर्वीच निकाली काढण्यात यश आले अशी माहिती जिल्हा न्यायालयाचे प्रथम न्यायाधीश सयाजीराव को-हाळे यांनी दिली आहे.

कोपरगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती व कोपरगाव वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन कोपरगाव न्यायालयात करण्यात आले होते. या लोकन्यायालयात दाखलपूर्व व दाखल असे दोन्ही प्रकारची १० हजार ८९३ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये दाखलपूर्व ८हजार ६७५ प्रकरणांपैकी ४हजार ६४४ प्रकरणे निकाली काढत २ कोटी ४८ लाख १८ हजार ८३८ रूपयांची वसूली करण्यात आली. तसेच दाखल २ हजार २१८ प्रकरणांपैकी १२७ प्रकरणे निकाली काढत २ कोटी ९३ लाख ५५ हजार ३ रूपयांची वसूली करण्यात आली. सर्व मिळुन ५कोटी ४१ लाख ७३हजार ८४१ रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली. कोपरगाव न्यायालयाने खटले निकालात जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावला तर दंडात्मक वसुलीत राहता न्यायालय  अग्रभागी आहे. राहता न्यायालयाने सर्वाधिक १५ कोटी ४० लाख २९ हजार दहा रुपये इतकी वसुली केली आहे. 

या प्रसंगी कोपरगांव जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष सयाजीराव को-हाळे, जिल्हा न्यायाधीश भुजंगराव पाटील, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर) शौकत देसाई, सहदिवाणी न्यायाधीश स्वरुप बोस, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर-२) महेश शिलार, सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठस्तर-३) भगवान पंडित, दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) स्मिता बनसोड, सहकार न्यायाधिश ल.मू.सय्यद, कोपरगाव तालुका वकील संघाचे अध्यक्ष  ॲड.शिवाजी खामकर, कोपरगाव जिल्हा सरकारी वकील ॲड. अशोक वहाडणे, कोपरगाव जिल्हा सहाय्यक सरकारी वकील   ॲड. शरद गुजर, सहाय्यक सरकारी वकील ॲड. अशोक टुपके, ॲड. मनोहर येवले, ॲड. योगेश खालकर, ॲड.सी. एम वाबळे, ॲड. एस. एम. वाघ, ॲड. शंतनू धोर्डे, ॲड. जयंत जोशी, ॲड. भास्कर गंगावणे, अमोल टेके, ॲड. एस.डी. गव्हाणे, ॲड. केतन शिरोडे, ॲड. दिपक जाधव, वकील बार लायब्रारीचे दत्तात्रय देवकर, महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा राज्याचे सचिव बंडू बडे, सागर नगरकर, न्यायालयीन कर्मचारी सुरज माळोदे, सागर गुरसाळे, राहूल बोडके, भगत, राठोड, तोत्रे, खलाणे, दिक्षित, कोळसे, लांडे, चौरे, अशोक दहिफळे, यांच्या सह लोकन्यायालयात दाखल केलेल्या विविध खटल्यांचे पक्षकार, वकील, संबंधित खात्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान राष्ट्रीय लोकन्यायालयात कोपरगाव न्यायालयाच्या वतीने आठ पॅनल करण्यात आले होते. यात पॅनल प्रमुख,सदस्य, कनिष्ठ लिपिक, शिपाई यांचा समावेश करण्यात आला होता. लोकन्यायालयात फौजदारी प्रकरणे, वाहन अपघात, भुसंपादन प्रकरणे, एन.आय.कायदा १३८ ची प्रकरणे, युनियन बॅंक, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर बॅंका व पतसंस्थांची प्रकरणे, ग्रामपंचायत, बी.एस.एन.एल. यांची प्रि-लिटिगेशन प्रकरणे,सहकार न्यायालय, तहसिल कार्यालय यांची दाखलपुर्व आणि प्रलंबित प्रकरणांचा समावेश होता.

 तालुक्यात ३१ ऑक्टोबर २०२२ ते १३ नोव्हेंबर  २०२२ या कालावधीत अखिलभारतीय  कायदे विषयक जनजागृती अभियान राबवण्यात आले होते. तालुक्यातील शाळा महाविद्यालये व गावपातळीवर विविध ठिकाणी २६ शिबिरे घेण्यात आले. यासाठी सर्व न्यायाधीश, वकील व इतर सामाजीक संघटनांनी सहकार्य केले.

राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या न्यायालयातुन २५ हजार ८२३ खटले निकाली काढण्यात आले तर ६६ कोटी ३० लाख ३४ हजार ७६० रुपयांची आर्थीक वसुली करण्यात आली.  वसुलीत राहता न्यायालय तर खटल्यात कोपरगाव न्यायालयाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.