आशा, गट प्रवर्तक संपाचा १३ वा दिवस, आशांनी केले जेलभरो आंदोलन

शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : आयटक सलग्न कृती समितीच्या वतीने आशा व गट प्रवर्तकांच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी संप सुरू असून संपाच्या १३ व्या दिवसी शेवगाव येथे कॉ. ॲड. सुभाष लांडे व संजय नांगरे यांच्या नेतृत्वाखाली जेलभरो आंदोलन करून राज्य व केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

ऑनलाईन कामाची सक्ती करु नये, त्यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा देण्यात यावा, दिवाळी बोनस जाहीर करावा, मानधन नको, कायमस्वरूपी वेतन आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. या वेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे संजय डमाळ आशा संघटनेच्या अंजली भुजबळ, शमा शेख, रोहीनी माळवदे, गिता थोरवे, सुवर्णा देशमुख, सुनिता लोंढे, वैशाली देशमुख, प्रमीला रोडगे, सुनिता गाडुळे, पौर्णीमा इंगळे, सुनेञा महाजन, अलका पाचे, वैशाली भुतकर, सुनिता भुजबळ, संगीता रायकर, वैशाली वाघुले आदी आंदोलनात सहभागी होत्या. पोलिसांनी सर्वांना अटक करून नंतर सोडून दिले.