रयत शिक्षण संस्थेच्या उत्तरविभाग अध्यक्षपदी आमदार काळेंची फेर निवड

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांनी उत्तर विभागीय अध्यक्षपदाची सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्यावर पुन्हा एकदा उत्तर विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देवून त्यांची एकमताने फेर निवड करण्यात आली आहे.

Mypage

        रयत शिक्षण संस्थेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या व रयत शिक्षण संस्थेचा विस्तार वाढविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या विचारांचा वारसा घेवून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या आ. आशुतोष काळे यांच्या खांद्यावर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांनी तीन वर्षापूर्वी उत्तर विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली होती.

Mypage

मागील तीन वर्षात दिलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळून मतदार संघाचा केलेला सर्वांगीण विकास अशी दुहेरी जबाबदरी आ. आशुतोष काळे यांनी चोखपणे पार पाडली आहे. त्यामुळे उच्च विद्याविभूषित असलेल्या आ. आशुतोष काळे यांच्यावर पुन्हा एकदा रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्याबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Mypage

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांनी माझ्या कार्यपद्धतीवर दाखविलेल्या विश्वासामुळे माझी पुन्हा रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदावर निवड झाली आहे. बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार स्पर्धेच्या युगात रयतचा विद्यार्थी कुठेच कमी पडणार नाही याची काळजी घेवू. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून माझी वाटचाल अशीच सुरु राहणार असून संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

Mypage