भाजपा प्रणित मंडळाचा मंगळवारी प्रचार शुभारंभ – ताराचंद लोढे

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि . २३ :  शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होणाऱ्या निवडणूकी करिता  भाजपा प्रणित आदिनाथ शेतकरी विकास मंडळाचा प्रचार शुभारंभ  मंगळवारी (दि. २५ )  सकाळी साडेआठ ला आव्हाणेच्या श्री गणपती मंदिरा जवळ आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे यांनी दिली.

Mypage

        यावेळी लोढे म्हणाले, शेवगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीकरिता भाजपा, शिवसेना, मनसे व मित्र पक्षाच्या वतीने आदिनाथ शेतकरी मंडळ या आघाडीच्या माध्यमातून बाजार समितीच्या सर्व मतदारसंघातील जागांसाठी प्रामाणिक, विकासाभिमुख व लोकप्रिय उमेदवार देण्यात आले असून या मंडळाच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी  खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील, शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, शिवसेना तालुका अध्यक्ष आशुतोष डहाळे, मनसे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

tml> Mypage

      कृषी उत्पन्न बाजार समिती ही कुणाची मक्तेदारी नसून शेतकऱ्याची संस्था आहे खऱ्या अर्थाने शेतकर्या च्या तसेच तेथे कार्यरत असलेल्या व्यापाऱ्यांच्या व हमाल मापाडी साठी निस्वार्थ भावनेने कार्य करण्यासाठी आदिनाथ शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहनही  लोढे यांनी यावेळी केले. 

Mypage