कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : लालबहादुर शास्त्री गन्ना किसान संस्था लखनौ येथील शेतक-यांच्या शिष्टमंडळाने संजीवनी उद्योग समुहास शुक्रवारी भेट देवुन पाहणी केली त्याबददल त्यांचा सत्कार करण्यांत आला.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यक्षेत्रातील उस उत्पादक शेतक-यांचे प्रति हेक्टरी उत्पादन वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजनाबाबत तसेच आपला कारखाना राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली व महाराष्ट्र राज्यात ऊस तोडणी व वाहतुक कारखाना स्वतंत्र यंत्रणेमार्फत करीत असल्याचे निर्दशनास आणुन दिले.
तसेच माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी शेतक-यांचा सर्वांगीण विकास हेच त्यांचे जीवनाचे अंतिम ध्येय मानून काम केले व त्याचीची जोपासना त्यांची पावी पिढी सक्षमपणे करीत असल्याचे नमुद केले. तसेच उत्त्तर प्रदेशचे अतिरिक्त सचिव संजय भुस रेड्डी व बिपीनदादा कोल्हे अध्यक्ष संजीवनी उद्योग समुह यांचे नेहमी सहकार व उस उत्पादन वाढीबाबत चर्चा होते व त्यांनी मागील सहा महिन्यापुर्वी उत्तरप्रदेशचेवतीने विशेष निमंत्रीत केले होते याची माहिती कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी याप्रसंगी दिली.
साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, केन मॅनेजर जी.बी. शिंदे, उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर, सचिव तुळशीराम कानवडे यांनी कारखाना ऊस लागवडीविषयी केलेल्या नाविन्यपुर्ण प्रयोगाविषयी माहिती दिली.
या शेतकऱ्यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या संजीवनी सेंद्रीय खत प्रकल्पास भेट देवुन त्याबाबत माहिती घेतली तर दहेगाव बोलका उस उत्पादक शेतक-यांच्या प्रत्यक्ष प्लॉटला भेट देवून लागवड व अन्य पिकाबाबत घेतली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक त्र्यंबकराव सरोदे यांनी शास्त्रोक्त मार्गदर्शन केले.
याप्रसंगी लखनौ गन्ना प्रबंधक वर्मा, गुलाबराव वल्टे, लक्ष्मणराव वल्टे, शेतकरी सहकारी संघाचे माजी उपाध्यक्ष विलासराव कुलकर्णी, सदाशिव वल्टे, संदिप वल्टे, नेताजी देशमुख, मनचरे आदि उपस्थित होते. शेवटी सचिव तुळशीराम कानवडे यांनी आभार मानले.