माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी डॉ. बिहाणी, तर सचिवपदी लोहिया यांची निवड

शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : शेवगाव तालुका माहेश्वरी सभेच्या अध्यक्षपदी डॉ. पुरुषोत्तम बिहाणी तर सचिवपदी श्रीवल्लभ लोहिया यांचेसह सर्व कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शेवगाव तालुका माहेश्वरी सभेच्या तालुकाध्यक्ष आणि कार्यकारणी निवडीसंदर्भात माहेश्वरी समाजाच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी जिल्हा सभेचे निवडणुक निरीक्षक अरुण झंवर व अतुल डागा यांची उपस्थिती होती. बैठक खेळेमेळीच्या वातावरणात पार पडली.

 यावेळी माहेश्वरी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. सुभाषचंद्र बाहेती ,गोपीकिसन बलदवा, प्रेमसुख जाजू, दत्तप्रसाद मुंदडा, दिलीप मुंदडा, दर्शन लड्डा, धनेश बाहेती, गौरव बाहेती, पुष्पक धूत, गोपीकिसन लोहिया, अविनाश पुरोहित, महेश राठी, कन्हैया सारडा यांचे सह माहेश्वरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     बिनविरोध निवड झालेले अन्य पदाधिकारी असे – उपाध्यक्ष – अरविंद धुत, सचिव – वल्लभ लोहिया, सहसचिव- मयूर कलंत्री, कोषाध्यक्ष-दत्तप्रसाद मुंदडा, संघटन मंत्री- श्रीकांतजी लढ्ढा.

     माजी सचिव जगदीश मानधने यांनी तीन वर्षाचा आढावा मांडला. कन्हैया सारडा यांनी सूत्रसंचालन केले. तर माजी अध्यक्ष प्रकाश लड्डा यांनी आभार मानले.