शुभांगी पाटील दुप्पट मतांनी पिछाडीवर
कोपरगाव प्रतिनिधी, दि.२ : नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीच्या पहील्या फेरी पासुन सत्यजित तांबे आघाडीवर असल्याने त्यांची विजयाच्या दिशेने घोडदौड सुरु आहे.
नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली. २८ टेबलावर मतमोजणी प्रक्रिया असुन आज दुपारी आडीज वाजता मतमोजणीला सुरु झाली. सर्व मतपञीका एका हौदात टाकण्यात आल्या नंतर त्यातुन मतमोजणीला सुरुवात झाली.
मतमोजणीच्यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधी मध्ये बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव झाला होता. माञ आयुक्त राधाकृष्ण गमे यानी हस्तक्षेपकेल्याने वातावरण निवळले. मतमोजणी सुरु होताच पहील्या फेरीतील २८ हजार मतापैकी १५ हजार ७८२ मते सत्यजित तांबे यांना मिळाल्याने ७ हजार ९२२ मतांची आघाडी घेतली, तर शुभांगी पाटील यांना केवळ ७ हजार ५०८ मते मिळाली.
सत्यजित तांबे यांना १५ हजार ७८२ मते मिळाली तर २ हजार मते बाद झाले. उर्वरीत मते इतरांना पडल्याने तांबे यांनी पहील्या फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. पुढे दुसऱ्या फेरीत तांबे यांना १४ हजाराची आघाडी मिळाला अखेर आत्ता तिसऱ्या फेरी अखेर सत्यजित तांबे यांना पहील्या पसंतीचे ४५ हजार ८२३ मिळाले तर शुभांगी पाटील यांना केवळ २४ हजार ५७२ मते मिळाल्याने तांबे हे २१ हजार मतांनी पहील्या पसंतीच्या आघाडीवर आहेत.
दरम्यान सत्यजित तांबे यांच्या विजयाची खाञी राज्यातील अनेकांना वाटत असल्याने पुण्यासह संगमनेर मध्ये आमदार सत्यजित तांबे यांचे हार्दिक अभिनंदन असे फलक लावले आहेत. निम्मा फरकाने मतांची तफावत दिसत असल्याने तांबे यांच्या विजयाची खाञी अनेकांनी वर्तवली आहे.