श्रावण मासानिमित्त महिलांना साडी-चोळीचे वाटप

Mypage

वैशंपायन यांचा दानधर्माचा वसा कुटुंबाने जोपासला

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : अष्टांग योगतज्ञ प. पू. दादाजी वैशंपायन यांनी आनंद दत्त सांप्रदायिक साधक समूहाच्या कल्याणासाठी अवघे आयुष्य वेचले, मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. तोच वसा त्यांच्या कुटुंबाने नेटाने पुढे चालवला असल्याचे प्रतिपादन शेवगावच्या गुरुदत्त सामाजिक संस्थेचे सचिव फुलचंद रोकडे यांनी केले.

Mypage

पूज्य दादाजींचे चिरंजीव तथा ज्येष्ठ साधक शरद वैशंपायन व स्नुषा ललिता वैशंपायन यांनी वैशंपायन कुटुंबीयांतर्फे अधिक मासाची सांगता तसेच श्रावण मासाच्या पर्वणीचे औचित्य साधून येथील वैशंपायन नगरमधील श्रीदत्त देवस्थानातील दत्तभक्त महिलांना गीता बाहेती यांच्या हस्ते साडी चोळीचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

Mypage

यावेळी शुभांगी गोसावी, छाया पवार, शोभा लांडे, राजश्री मुरदारे, भक्ती जोगळेकर, दीपा शेजुळ, उज्वला डोंब, सिंधू मुरदारे, रोहिणी गुजर, सुनिता धायतडक, सुनिता लांडे, सीमा कातकडे, पल्लवी कोरडे, गंगा भालसिंग, गिता बाहेती, जयश्री काळे, मंगल नेहूल, प्रीती शेजुळ, सुनंदा शिंपी, विद्या जाधव, किरण बिहाणी, सुनीता गाढे, आशा पाखरे, प्रमिला डहाळे आदी २३  महिला दत्तभक्तांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.

Mypage

दत्तभक्त सुभाष गोलांडे, संजय कुलकर्णी, योगेश रोकडे, अशोक मुरदारे, निलेश रोकडे, आदी यावेळी उपस्थित होते. जगन्नाथ गोसावी यांनी प्रास्ताविक केले, तर मनेष यांनी आभार मानले. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *