नारी शक्तीला तोड नाही – न्यायाधिश संजना जागुष्टे

शेवगाव प्रतिनिधी, दि.१२ :  महिला पुरुषांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत. आज विविध क्षेत्रात त्या पुरुषाच्या बरोबरीने काम करत असून नारी शक्तीला तोड नाही हे त्या करत असलेल्या क्षेत्रातील कामावरून प्रतित होत असल्याचे प्रतिपादन शेवगाव येथील न्यायालयाच्या दिवाणी न्यायाधिश संजना जागुष्टे यांनी केले.

येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. न्या. जागुष्टे पुढे म्हणाल्या, सध्या समाज माध्यमांचा विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव असल्याचे चित्र आहे. ते बदलायला हवे.

तसेच समाज माध्यमाचा उपयोग चांगल्या कामासाठी व्हायला हवा. विद्यार्थ्यांनी आपला बहुमोल वेळ वाया घालू नये. आणि दृष्टी पंथात आलेली संधी न सोडता तीचे सोने करावे. असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे होते. यावेळी महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सत्कार करण्यात आले.

यावेळी उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, डॉ. उषा शेरखाने, प्रा. मिनाक्षी चक्रे, डॉ. छाया भालशंकर, अॅड. ज्ञानेश्वर गाडेकर, अॅड. अजय मोहिते, महिला प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. डॉ. गोकुळ क्षिरसागर यांनी प्रास्ताविक तर प्रा. विठ्ठल देवढे यांनी सुत्रसंचलन केले. डॉ. रवींद्र वैद्य यांनी आभार मानले.