समताच्या रक्तदान शिबिरात ७३ दात्यांनी केले रक्तदान

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे रक्तदात्याने केलेले रक्तदान हे गरजवंतासाठी अमृत असते. आजच्या आधुनिक युगात रक्तदान करणे हे सर्वश्रेष्ठ रक्तदान मानले जाते. ‘रक्तदान करू या, एखाद्याला नवीन आयुष्य देऊ या.’ या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्ताची कमतरता भासल्यास ती पूर्ण करण्याचा सामाजिक प्रयत्न करत आहोत.

समता परिवार व इतर सामाजिक संस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक वर्षी रक्तदान करणाऱ्यांची संख्या वाढत असून या ही वर्षी ७३ रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याचे समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी सांगितले.

भारतातील सहकार परदेशात नेऊन भारत देशाचे प्रतिनिधित्व करणारे असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ॲक्यू ) चे संचालक व कोषाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त समता पतसंस्थेच्या समता सहकार सभागृहात समता चॅरिटेबल ट्रस्ट, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब ऑफ कोपरगाव, लिंगायत संघर्ष समिती कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.

 शिबीराचा शुभारंभ सामाजिक दायित्वाच्या बाबतीत ११४ वेळा रक्तदान करणारे एक आदर्श व्यक्तिमत्व ५२ वर्षीय प्रवीण वाणी यांच्या रक्तदानाने करण्यात आला. तसेच सुधनचे अध्यक्ष संदीप कोयटे, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुमित भट्टड, समता पतसंस्थेचे संचालक गुलशन होडे, लिओ क्लबचे अध्यक्ष पृथ्वी शिंदे, नाशिक येथील समता ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ. इरफान खान, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा, भीमजीभाई पटेल, राजेंद्र शिरोडे, राजेश ठोळे, किरण शिरोडे, दिपक अग्रवाल, शिवकुमार सोनेकर, प्रदीप साखरे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.

 कोपरगाव तालुक्यातील विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून रक्तदान केले. शिबिर यशस्वीतेसाठी नाशिक येथील समता ब्लड बँकेचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच रक्तदान समता चॅरिटेबल ट्रस्ट, समता पतसंस्था, लायन्स क्लब ऑफ कोपरगाव, लिओ क्लब, लिंगायत संघर्ष समितीचे पदाधिकारी, सदस्य आदींनी विशेष परिश्रम घेतले.