कोपरगांव प्रतिनिधी, दि. २५ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागीय समितीच्या वतीने प्रवरानगर येथे घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन जिल्हास्तरीय बुध्दीबळ स्पर्धांमध्ये संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या मुलांच्या व मुलींच्या दोनही संघांनी आपल्या बुध्दीबळाचे चातुर्य दाखवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला.
संजीवनी आणि स्पर्धा यात संजीवनी जिंकणारच, या विधानाला संजीवनीच्या बुध्दीबळ पटूंनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. पुढील आंतरविभागीय स्पर्धा पुणे येथे होणार असुन यात अहमदगर जिल्ह्याच्या मुलांच्या संघात एक तर मुलींच्या संघात तिघींना अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे, अशी माहिती महाविद्यालयांच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व बुध्दीबळ पटूंचा छोटेखांनी कार्यक्रमात सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. ए.जी. ठाकुर, मार्गदर्शक प्रा. सुमित गुप्ता, प्रा. जसबिंदर सिंग, डॉ. जी. पी. नरोडे, डॉ. परीमल कचरे, प्रा.शिवराज पाळणे उपस्थित होते.
मुलींच्या संघात पुर्वा जयसिंग पोखरकर, सानिया करीम पठाण, गंगोत्री परशुराम खुमकर, आदिती रविंद्र देठे, प्रियंका रामलाल हलवाई व श्रुती उमेश साबळे यांचा समावेश होता. मुलांच्या संघात स्वप्निल जितेंद्र नाईकवाडी, जयवंत बाळासाहेब बरखडे, ओम भाऊसाहेब पाटील, नामदेव महेश गिरमे, निशांत कैलास भांड, सचिन अनिल बोऱ्हाडे व जय नंदकिशोर खाटवते यांचा समावेश होता.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालये, इंजिनिअरींग व फार्मसी महाविद्यालये हॉटेल मॅनेजमेंट अशा संस्थांमधुन मुलांचे व मुलींचे प्रत्येकी २५ संघांनी या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. पुणे येथिल आंतर विभागीय स्पर्धांसाठी अहमदनगर जिल्ह्याच्या मुलींच्या संघात पुर्वा पोखरकर, सानिया पठाण व गंगोत्री खुमकर यांची निवड झाली तर मुलांच्या संघात स्वप्निल नाईकवाडी याची निवड झाली.