नगरपरिषदेने सुलभ शौचालय उभारण्याची मागणी

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.२१:  सुमारे ५० हजार लोकवस्तीचे शेवगाव हे तालुक्याचे ठिकाण असून ते पंचक्रोशीतील मेडिकल, इंजिनिरिंग आदि शिक्षण उपलब्ध असलेले प्रमुख केंद्र आहे. येथे विविध विभागीय शासकीय कार्यालये आहेत. जिल्ह्यातील पहिले आगार असल्याने दळणवळणाची मोठी सोय  उपलब्ध असल्याने तालुक्यातील ११२ गावातील असंख्य लोकांची शेवगावात सातत्याने वर्दळ चालू असते. तरीही नगरपरिषद असलेल्या शेवगाव शहरात  एकही सुलभ शौचालय नाही.

Mypage

शेवगावातील सामाजिक कार्यकर्ते डॉ.निरज लांडे, अमोल माने, प्रा.नितीन मालानी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, मच्छिंद्र बर्वे यांनी बुधवारी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांचेकडे एका निवेदनाद्वारे शहराच्या मध्यवस्तीत एक सुलभ शौचालय उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, शेवगावची मुख्य बाजारपेठ हा अतिशय गजबजलेला परिसर आहे.

Mypage

विविध ठिकाणचे लोक खरेदी-विक्री, व्यापार, व्यवसायाच्या निमिताने या शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये येत असतात. त्यामुळे रोज करोडो रुपयांची उलाढाल या व्यापार पेठेत होत असते. मात्र, या बाजारपेठेमध्ये स्त्री पुरुषासाठी एकही सुलभ शौचालय उपलब्ध नाही. त्यामुळे माता भगिनींची मोठ्या प्रमाणात कुचंबना होते. पेठेतील व्यावसायिक व शेकडो कर्मचाऱ्यांना देखील हा प्रश्न कायम भेडसावत असतो. या सर्व असुविधेचा विपरीत परिणाम शेवगाव शहराच्या संपूर्ण बाजार पेठेवर होतो.        

Mypage

त्यामुळे नागरिकांची ही मुलभूत गरज लक्षात घेऊन शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या जुन्या जनावरांच्या कोंडवाड्याच्या जागेत अद्ययावत सुलभ सौचालयाची उभारणी नगरपरिषदेला लगेच करता येऊ शकते. ती करावी अशी विनंती या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. याशिवाय सर्वांच्या सुरक्षे करता शहरातील मुख्य अकरा चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत तसेच एका अग्निशमन गाडीची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी देखील याच निवेदनात करण्यात आली आहे. 

Mypage