सॉफ्टबॉल स्पर्धेत काकडे विद्यालयाचे यश

शेवगाव प्रनिनिधी,दि.२१ : बारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या पुणे विभागीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये येथील आबासाहेब काकडे विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुलींच्या संघाने पुणे विभागीय सॉफ्टबॉल स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

या स्पर्धेमध्ये साक्षी लहाने, साक्षी केदार, दिव्या काकडे, अलिना शेख, स्वर्णीमा नलावडे, अंजली खवले, रइसा शेख, ध्रुवीका बडे, श्रुती कमानदार, धनश्री टेकाळे यांनी अप्रतिम खेळ केला. या खेळाडूना क्रीडा शिक्षक कल्पेश भागवत व विक्रम घुटे, संतोष ढोले, रुपाली चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड.डॉ.विद्याधर काकडे, माजी जि.प.सदस्या हर्षदा काकडे, प्रा. लक्ष्मण बिटाळ, संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे, प्राचार्य संपत दसपुते, उपप्राचार्या रुपा खेडकर यांनी अभिनंदन केले.