आमदार काळेंच्या वचनपुर्तीतून कोपरगावच्या आरोग्य व्यवस्थेला मिळणार बळकटी

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार संघातील नागरिकांना कोपरगावमध्ये सुसज्ज रुग्णालय उभारणार असे वचन दिले होते. त्या वचनांची पूर्तता करण्यासाठी निवडून आल्यापासून आरोग्य विभागाकडे आ.आशुतोष काळे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळविण्यात त्यांना यश मिळाले होते. त्यासाठी लवकरात लवकर निधीची तरतूद व्हावी यासाठी केलेल्या प्रयत्नातून निधी उपलब्ध होवून २८.८४ कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून आ.आशुतोष काळेंच्या वचनपुर्तीतून कोपरगावच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.  

Mypage

कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात कोपरगाव शहरात असलेले ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यात कमी पडत असल्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालय व्हावे. यासाठी आ.आशुतोष काळे यांनी निवडून आल्यापासून केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगावला १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळविली होती. त्यानंतर या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी लवकरात लवकर निधीची तरतूद व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्या प्रयत्नाची दखल घेवून नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी २८.८४  कोटी निधीस मंजुरी देण्यात आली असून या कामाची निविदा देखील प्रसिद्ध झाली आहे.

tml> Mypage

येत्या काही दिवसात या उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरु होणार असून दोन वर्षात सर्व सुविधांयुक्त सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय मतदार संघातील नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. मतदार संघातील असंख्य रुग्णांना दुर्धर आजारावर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी जवळपास १०० किलोमीटर अंतर पार करून जावे लागत होते. एवढे मोठे अंतर पार करीत असतांना अंत्यवस्थ रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे कोपरगाव येथे होणाऱ्या १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून नागरिकांची आरोग्याच्या दृष्टीने मोठी समस्या दूर होणार आहे.

Mypage

१०० बेडचे कोपरगाव उपजिल्हा रुग्णालयास निधी उपलब्ध होवून लवकरच प्रत्यक्षात काम सुरु होणार असल्यामुळे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना सर्व प्रकारच्या आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहे. उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टर्स, अतिदक्षता विभाग असल्यामुळे अंत्यवस्था रुग्णांना पुढील उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नसून नागरिकांची मोठी सोय होणार असून नागरिकांचा आरोग्याचा अत्यंत महत्वाचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांच्या वचनपुर्तीतून यानिमित्ताने सुटला आहे. त्यामुळे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार, आरोग्यमंत्री ना.तान्हाजी सावंत यांचे आभार मानले आहे.

Mypage