कोपरगाव प्रतिनिधी, दि.२१ : कोऱ्हाळे येथील श्री गणेश शैक्षणिक संकुलात वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक सोहळा व खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र माझा संकल्पना केंद्रस्थानी ठेवून २१०० विद्यार्थी आपले कलागुण सादर करणार आहेत. खवय्यांसाठी खास खाद्य पदार्थांचे भव्य दिव्य असे नियोजन केलेले आहे.
आयोजित स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची परंपरा, कला, साहित्य, जडणघडण विद्यार्थी आपल्या कला गुणांमधून मांडणार आहे. यासाठीच स्नेहसंमेलनासाठी महाराष्ट्राच्या सामान्य माणसापासून ते देशपातळीवर विविध क्षेत्रात काम करणारे प्रमुख अतिथी उपस्थित राहणार आहेत. दि.२२ डिसेंबर रोजी यामध्ये शिर्डी विभागीय अधिकारी माणिक आहेर, साई आश्रया आश्रमचे संस्थापक गणेश दळवी, पालक रामनाथ चौधरी, माजी विद्यार्थी आर्या पितांबरे दि.२३ डिसेंबर रोजी शिर्डी अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, कोऱ्हाळे लोकनियुक्त सरपंच पूजा झिंजुर्डे, उद्योजक रवी नेवगे,
दिलीप सदाफळ, पालक बंडू दुशिंग तसेच दि.२४ डिसेंबर रोजी पद्मश्री पोपट पवार, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओम प्रकाश कोयटे, आदर्श सरपंच भास्कर पेरे, शिर्डी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, माजी विद्यार्थी, काजोल खैरनार, सिद्धेश डुंबरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नर्सरी ते १२ वी वर्गातील विद्यार्थ्यांचे नृत्याविष्काराचा आनंद घेण्यासाठी व भविष्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी पालक व परिसरातील पालकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे यांनी दिली.