शेवगाव प्रतिनिधी, दि . २०: संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ऋषीकेश प्रतापराव ढाकणे तर उपाध्यक्षपदी प्रा.माधव भिवसेन काटे यांची आज बिनविरोध निवड झाली आहे.
आज कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. प्रविण लोखंडे यांनी संचालक मंडळांच्या बोलाविलेल्या बैठकीत अध्यक्षपदासाठी ऋषीकेश ढाकणे यांच्या नावाची सूचना पांडूरंग काकडे यांनी मांडली तर शिवाजी जाधव यांनी अनुमोदन दिले. तसेच उपाध्यक्षपदासाठी माधव काटे यांच्या नावाची सूचना सदाशिव दराडे यांनी मांडली त्यास श्रीमंत गव्हाणे यांनी अनुमोदन दिले .
अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी एकेकच अर्ज दाखल झाल्याने निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. लोखंडे यांनी दोन्ही पदाधिकाऱ्याची
बिनविरोध निवड जाहीर केली. बिनविरोध निवड जाहीर होताच फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.
अध्यक्ष ऋषीकेश ढाकणे, सत्काराला उत्तर देताना म्हणाले अतिशय कष्टातून व प्रतिकूल परिस्थितीतून बबनराव ढाकणे यांनी उभारणी केली, प्रतापराव ढाकणे यांनी अडचणीत कारखान्याला उर्जित अवस्था निर्माण करून दिली. त्यांनी सभासदांच्या हितासाठी रक्ताचे पाणी केले मात्र कारखाना विकू दिला नाही. मी लहानपणापासून केदारेश्वर कारखान्याच्या संघर्षाचा इतिहास जवळून पहिला आहे. प्रस्थापितांनी या संस्थेला अडचणीत आणून या भागातील शेतकरी ऊस उत्पादक व सभासदांची पिळवणूक केली. मला कमी वयात संस्थेची जबाबदारी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
भविष्यात इथेनॉल उभारणीचा प्रकल्प लवकरच सुरू होणार असून त्यासोबतच उपपदार्थ निर्मिती संदर्भातही आपण वाटचाल करणार आहोत. माझ्यावर आदरणीय बबनराव व प्रतापराव ढाकणे यांचे संस्कार आहेत त्याची पायमल्ली मी कधीही होऊ देणार नाही. सभासदांनी दिलेल्या विश्वासला तडा जावू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी शेवटी दिली. राष्ट्रवादीचे नेते प्रतापराव ढाकणे, मुख्यकार्यकारी अधिकारी अश्विनीकुमार घोळवे, माधव काटे यांनीही विचार व्यक्त केले.
यावेळी प्रमोद विखे, बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे, कुंडलिक घोरतळे, भाऊराव भोंगळे, संचालक डॉ. प्रकाश घनवट, बाळू फुंदे, भाऊसाहेब मुंडे, सुरेशचंद्र होळकर, अशोक तानवडे, बापूराव घोडके, श्रीमंत गव्हाणे, रणजित घुगे, शिवाजी जाधव, पांडूरंग काकडे, सदाशिव दराडे, तुषार वैद्य, त्रिंबक चेमटे, सुभाष खंडागळे, सौ. मिना बोडखे, सौ. सुमन दहिफळे, कार्यकारी संचालक रमेश गर्जे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. शरद सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले तर तुषार वैद्य यांनी आभार मानले.