शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : राष्ट्रीय संरक्षण कायदा १९८६ व त्यात झालेल्या सुधारीत तरतुदी नुसार २०१९ पासून लागू झालेल्या नवीन कायद्याबाबत ग्राहकांनी जागरूक असणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनामध्ये ग्राहकांची जेव्हा फसवणूक होते तेव्हा त्यांनी रीतसर ग्राहक निवारण कक्षाकडे तक्रार दिली तर त्याची दखल घेतली जाते त्यासाठी ग्राहकांनी ग्राहक संरक्षण कायद्याचा आधार घेऊन आपला न्याय हक्क प्राप्त केला पाहिजे असे आवाहन तहसीलदार छगनराव वाघ यांनी केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत शेवगाव तसेच अन्न व नागरी पुरवठा विभाग शेवगाव तहसील यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष अशोक शेवाळे, प्राचार्य शिवदास सरोदे, अर्जुनराव देशमुख, विनायक क्षेत्रीय आदींची भाषणे झाली. कार्यक्रमासाठी रवींद्र शेळके,रघुनाथ सातपुते, बन्सीधर आगळे, किसन माने विविध विभागांचे पदाधिकारी वितरक ग्राहक व प्रशासनाचे कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले तर वसुधा सावरकर यांनी आभार मानले.