सुतार-लोहार समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द – आ.आशुतोष काळे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : कर्मवीर शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे  यांनी नेहमीच सर्व समाज बांधवांना धार्मिक सामाजिक कार्यात मोठी मदत केली आहे. तोच वसा आणि वारसा पुढे चालवितांना सुतार – लोहार समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.

Mypage

 कोपरगाव येथे विश्वकर्मा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आ. आशुतोष काळे बोलत होते. ते म्हणाले की, कोपरगाव शहराच्या सर्वांगिण विकासाला चालना देवून कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाण्याचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावला असून ५ नंबर साठवण तलावाचे काम प्रगती पथावर आहे. त्याच बरोबर विविध समाजाच्या समाज बांधवांच्या मागणी नुसार सभा मंडपासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असून सुतार-लोहार समाजाच्या सभा मंडपासाठी देखील १० लाख रुपयांचा निधी दिला आहे.

Mypage

इतर सभा मंडपाच्या कामाचे काम वेगाने सुरू असून सुतार-लोहार समाजाच्या सभा मंडपाच्या कामाची देखील निविदा प्रसिद्ध झाली असून यांनी लवकरच प्रत्यक्षात कामास प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. व यापुढील काळात देखील सुतार-लोहार समाज बांधवांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी सोडविनार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले भगवान विश्वकर्मा महाराजांचे दर्शन घेऊन सर्व समाज बांधवांना भगवान विश्वकर्मा जयंतीच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या.

Mypage

      यावेळी ह.भ.प. उंडे महाराज, विजयराव जाधव, सूर्यकांत जाधव, दत्तात्रय क्षीरसागर, संजय दिवेकर, राजु कापडे, सुभाष क्षीरसागर, सुभाष दिवेकर, उमेश दीक्षित, राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे, संदीप कपिले, सचिन गवारे, संजय लोहारकर, अच्युत कडलग, विशाल आवारे, अनिकेत वाकचौरे, किरण सूर्यवंशी, आदी मान्यवरांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *