कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव काळे यांच्या मातोश्री श्रीमती यशोदाबाई किसनराव काळे यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी वृद्धपकाळाने दु:खद निधन झाले आहे. माजी आमदार अशोकराव काळे यांच्या त्या चुलती होत्या.
नेहमी धार्मिक व सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या माहेगाव देशमुख येथील श्रीमती यशोदाबाई काळे यांना तीन मुले व दोन मुली,सुना, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव काळे, तसेच प्रगतीशील शेतकरी शिवाजीराव काळे व माहेगाव देशमुखचे विद्यमान उपसरपंच भास्करराव काळे यांच्या त्या मातोश्री होत्या व आमदार आशुतोष काळे यांच्या त्या चुलत आजी होत्या. काळे परिवारातील जेष्ठ व्यक्ती असलेल्या यशोदाबाई काळे यांच्या निधनामुळे संपूर्ण माहेगाव देशमुख व परीसरावर शोककळा पसरली आहे.