ज्ञानदेव गायकवाड यांचे निधन 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : संवत्सर येथील ज्ञानदेव उर्फ माउली कचरू गायकवाड (६९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना नातवंडे असा परिवार आहे. संवत्सर पोष्ट ऑफिसचे अधिकारी, वृत्तपत्र छायाचित्रकार जय जनार्दन फोटोचे दत्तात्रय गायकवाड यांचे ते वडील होत.

कै.ज्ञानदेव गायकवाड यांच्या निधनाबद्दल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाच्या नेत्या स्नेहलता कोल्हे, राज्य सहकारी साखर संघाचे संचालक विवेक कोल्हे, महानंदाचे अध्यक्ष राजेश परजणे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रमेश घोडेराव, आदींनी शोक व्यक्त केला.

त्यांच्या पार्थीवावर संवत्सर गोदातिरी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कै.ज्ञानदेव गायकवाड अत्यंत धार्मिक, व मनमिळावू स्वभावाने सर्वांचे परिचित होते. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली.