हातगाडी, फेरीवाले, रिक्षावाले यांनी वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ०१: शेवगावातील हातगाडी विक्रेते (हॉकर्स) यांची उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील यांच्या दालनात बैठक घेऊन रस्त्यावरील हातगाडी फेरीवाले रिक्षावाले यांना सुचना देण्यात आल्या. वाहतुकीला अडथळा येणार नाही याची काळजी घेऊन, प्रत्येकाने आपापले व्यवसाय करावेत. वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे अशा सूचना दिल्या.

Mypage

नगर पालिकेने हॉकर्स झोनसाठी ठरवून दिलेल्या रस्त्यावर पांढरे पट्टे लवकरात लवकर पेंट करून द्यावेत सर्व हातगाडीवाल्यांनी आपल्या गाडीसमोर वाहने लावू देऊ नये. अशी सूचना देणारे फलक लावावेत. तसेच सर्व हाॅकर्स यानी आपल्या गाडी समोर नो पार्किंग बोर्ड लावण्याच्या सूचना दिल्या. याबाबत जो टाळाटाळ करेल त्याच्यावर पोलीस प्रशासन कारवाई करील. असे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सांगितले.

Mypage

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे, राज्य सेक्रेटरी रिक्षा युनियनचे अध्यक्ष, कॉ. ॲड. सुभाष लांडे, शहिद भगतसिंग हाॅकर्स युनियन अध्यक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य, कॉ. संजय नांगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अशिष शेळके नगर परीषद, अधिकारी सोनटक्के, वाहतूक पोलीस शाखेचे राहुल खेडकर, गणेश गलधर, फेरीवाले संघटनेचे इरफान पठाण, जुबेर शेख, मुन्ना भोकरे, राहुल धनवडे, बन्सी गायकवाड, बबलु गुप्ता, जावेद बागवान, किरण गायकवाड, सतीष गायकवाड, भुजबळ पप्पु, धनवडे अप्पा, राजेंद्र मोहीते, राजेंद्र भातकुडे, भगवान कांबळे, यांच्या सह हाॅकर्स संघटनेचे सभासद उपस्थित होते. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *