बुद्धिबळ, बेसबॉल स्पर्धेमध्ये निर्मल ब्राईट फ्युचर स्कूलचे यश

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तसेच जिल्हास्तरीय ज्युनिअर बेस बॉल स्पर्धेमध्ये निर्मल ब्राईट फ्युचर स्कूल मधील सहा खेळाडूंचा जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन आबासाहेब काकडे माध्यमिक विद्यालय शेवगाव व बेसबॉल स्पर्धेचे संजीवनी इंजिनीरिंग कॉलेज कोपरगाव येथे करण्यात आले.

बेसबॉल स्पर्धेमध्ये या विद्यालयातील अभिनव सातपुते व यश पवार यांची निवड अमरावती येथे होणाऱ्या, राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा बेसबॉल संघात झाली आहे. तर बुद्धीबळ मुलींच्या गटामध्ये 1) अपूर्वा चिंतामण २) आराध्या गर्जे ३) मनस्वी मोरे यांनी यश प्राप्त केले तर १७ वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये मंगेश चोथे याने द्वितीय क्रमांक संपादन केला. यश संपादन केलेल्या सर्व खेळाडूंची निवड संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी झाली आहे.

या खेळाडूना क्रीडा शिक्षक आशिष मेहेत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष डॉ. ॲड. विद्याधर काकडे, हर्षदाताई काकडे, विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे, प्रा. लक्ष्मण बिटाळ, प्रा.सुनील आढाव, प्राचार्य अविराज काळे यांनी कौतुक केले.