पत्नीच्या पाठोपाठ पतीचे निधन

Mypage

शेवगाव, प्रतिनिधी दि.१७ : पत्नीचे निधन होऊन चार दिवस झाले तर, पत्नीचा दहावा होण्याच्या आतच पतीचाही
स्वर्गवास झाल्याने हृदय हेलावणारी घटना आज येथे घडली.

Mypage


तालुक्यातील लाखेफळ येथील वारकरी संप्रदायाच्या हौसाबाई गोरक्षनाथ सोनवणे (वय ६४) यांचे १३ जूलैला निधन झाले होते. त्याच्या अंत्यविधीसाठी दूर वरून आलेले निकटवर्ती पैपाहूने अद्याप त्यांच्या घरीच होते. तोच आज हौसाबाईचे पति तथा सेवानिवृत्त केद्र प्रमुख गोरक्षनाथ मारुती सोनवणे (वय ७५) यांचे ही निधन झाले आहे. कै.गुरुजीनी शेवगाव, पाथर्डी तालुक्यात जवळपास ४० वर्षे सेवा केली. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक होता. पत्नीच्या पाठोपाठ चवथ्याच दिवशी सोनवणे गुरुजी यांचे निधन झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Mypage


त्यांच्या मागे एक भाऊ, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याचे लिगल ऑफिसर शरद सोनवणे यांचे ते वडिल होत. 

Mypage
advt.

Mypage