शेवगाव प्रतिनिधी, दि. ३० : शेवगाव पोलिसांनी अवैध गांजाची लागवड करणाऱ्या वर धडक कारवाई करत तब्बल ७० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, शेवगाव पोलीस स्टेशनचे आयपीएस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार तालुक्यातील बालमटाकळी येथे शंकर असराजी छाजेड ( वय ३०) याने गट न. ७४ मध्ये त्याच्या मालकीच्या शेतात अवैध, बेकायदेशीर रीत्या गांजाची लागवड केल्याची खात्री करून तेथे सापळा लावून पंचासमक्ष ७० हजार रुपये किंमतीची १३ किलो ९६५ ग्रॅम वजनाची एकूण २ गाजाची मोठी झाडे तसेच हिरवी झाडे आढळून आली ती जप्त करण्यात आली.
छाजेड याच्या विरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५ चे कलमानुसार हे.कॉ. नानासाहेब गर्जे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई विभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील, रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि दीपक सरोदे, सपोनि आशिष शेळके पीएसआय भास्कर गावंडे पोना. ईश्वर गर्जे पोना. सुखदेव धोत्रे, पोना. किशोर काळे, पोकॉ. संपत खेडकर. पो कॉ. संतोष वाघ, पोकॉ. प्रशांत आधळे पो कॉ. असलम बेग पोकॉ वैभव काळे पोकॉ. संदिप म्हस्के यांचे पथकाने केली आहे.