परपुरुषाशी शारीरिक संबध ठेवण्यास सख्या आईची मुलीला जबरदस्ती

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : सख्या आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलीला परपुरुषा समवेत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या घटनेने खळबळ उडाली.  तालुक्यातुन संताप व्यक्त केला जातोय. हि घटना कोपरगाव तालुक्यातील मनेगाव येथे घडली. पीडित मुलीची आई व आरोपी आबासाहेब रामचंद्र भडांगे ( रा. वेस, ता.कोपरगाव ) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Mypage

सदर घटना पिडीत मुलीच्या घरात सहा सप्टेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. राहाता पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण संरक्षण अधिनियम कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आईच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा सर्व स्तरावर निषेध होतो आहे.

Mypage

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील मनेगाव येथील इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला चक्क तिच्या जन्मदात्या आईने आपल्या समाजाच्या चालीरीतीनुसार  तुला परपुरुषांसमवेत संबंध ठेवावे लागेल असे म्हणत आरोपी आबासाहेब रामचंद्र भडांगे ( रा. वेस, ता.कोपरगाव ) याच्या समवेत संबंध ठेवावे लागेल असे सांगितले.

Mypage

पिडीत मुलीने सदर कृत्य करण्यास नकार दिला. मुलीने नकार देताच आईने मुलीला धमकावत आपल्या समाजात असेच करावे लागते त्यामुळे  तुला  हे करावेच लागेल. तू जर असे केले नाही तर तुझ्याकडे पहावे लागेल असे म्हणत चक्क बळजबरीने आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीला आबासाहेब रामचंद्र भडांगे नावाच्या इसमाच्या ताब्यात दिले. सदर मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असून सुद्धा  तिच्या इच्छेविरुद्ध घरातील एका खोलीत नेऊन आरोपीने अत्याचार केले. सदर घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

Mypage

पीडित मुलीच्या नातेवाईकाने राहता पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. आरोपींवर बालकांचे लैंगिक शोषण संरक्षण अधिनियम कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधीक्षक संजय सातव यांनी भेट दिली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड हे करीत आहेत.

Mypage