संजीवनी ज्यु. कॉलेजचा सॉफ्टबॉल संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम

कोपरगांव प्रतिनिधी, दि. २५ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र  राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत शेवगाव येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धांमध्ये संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनियर कॉलेजच्या संघाने प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण  करीत खेळाचे कौशल्य दाखवित दणदणीत विजय मिळविला. हा संघ आता विभागीय स्पर्धांमध्ये अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे, अशी  माहिती ज्यु. कॉलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व विजयी खेळाडूंचा सत्कार करून त्यांना विभागीय सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, प्राचार्य डॉ. आर. एस. शेंडगे  व सर्व क्रीडा संचालक उपस्थित होते. विश्वस्त सुमित कोल्हे यांनीही सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

          पत्रकात पुढे म्हटले आहे की, कर्णधार चैतन्य नानासाहेब लोंढे व उपकर्णधार सत्यम सोमनाथ ठुबे यांच्या नेतृत्वाखाली ओम रविंद्र अडसुरे, देवेंद्र हिरालाल जांगडा, श्रेयश चंद्रशेखर काजळे, फरहान अय्याज कादरी, साहिल सचिन अरगडे, स्वयम दिपक डोंगरे, आर्यन राजेंद्र आवारे, सार्थक वसंत पाटोळे, चैतन्य गणपत पवार, मनीष  ज्ञानदेव साळुंके, कुणाल राहुल भुजबळ, अनुराग बाळासाहेब तांबे, तिर्थ देविदास दौंड व प्रणव रविंद्र दवंगे यांनी उत्कृष्ट  खेळाचे प्रदर्शन  करीत क्रीडा प्रेमी प्रेक्षकांच्या डोळ्याचे  पारणे फेडले.

           यापुढे विभागीय सामने होणार असुन त्यातही जिंकण्याच्या जिध्दीने सराव चालु असुन यात पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर व सोलापुर मधिल संघ सहभागी होणार आहेत. शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच संजीवनी मध्ये क्रीडा क्षेत्राला विशेष महत्व दिल्या जात असल्यामुळे संजीवनीचे क्रीडापटू बहुतांशी  क्रीडा मोहिमांमधुुन बक्षिसे खेचुन आणत आहेत, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.